विरार, नालासोपाऱ्यात ७ कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या १२५ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:42 AM2020-04-28T04:42:11+5:302020-04-28T04:42:24+5:30
नालासोपा-यातील दोन पुरुष, विरारमधील दोन पुरुष आणि विरारमधील तीन महिला पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे वसई-विरार शहरातील बाधितांची संख्या १२५ वर पोहोचली आहे.
वसई : विरार-नालासोपारा शहरात सोमवारी दिवसभरात ७ नवे रुग्ण आढळले. यात नालासोपा-यातील दोन पुरुष, विरारमधील दोन पुरुष आणि विरारमधील तीन महिला पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे वसई-विरार शहरातील बाधितांची संख्या १२५ वर पोहोचली आहे.
रुग्णांमध्ये नालासोपाºयाचे २३ वर्षीय व ४३ वर्षीय रुग्ण मुंबईत टेक्निशियन असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. तर विरारमधील ३६ वर्षीय आणि ५९ वर्षीय पुरुष रुग्ण हॉटेल कर्मचारी आहेत. त्यातच विरार पश्चिमेच्या २३ वर्षीय, ३५ वर्षीय आणि ३० वर्षीय अशा तीन महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या असून या सर्वांवर वसई, नालासोपारा व मुंबईत उपचार सुरू आहेत.
वसई-विरार पालिका हद्दीतील बाधित १२५ रूग्णांतील चार जणांना घरी सोडले. ८ जणांचा मृत्यू झाला असून ७६ जणांवर उपचार सुरू आहेत.
वसई-विरार पालिकेच्या विविध भागात व मुंबईत उपचारासाठी दाखल असलेल्या विरारमधील एक व नालासोपाºयात पूर्व-पश्चिमधील तीन अशा चार रुग्णांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सोमवारी पालिकेने रुग्णालयातून घरी सोडले. हे रुग्ण घरी पोहोचल्यावर गावकऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
>बोईसरला आढळला पहिला रुग्ण
बोईसर येथील ३४ वर्षीय रुग्ण चाचणीतपॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे त्याचे जवळचे नातेवाईक व संपर्कात आलेल्या दहा जणांचे विलगीकरण केले असून त्यांचे नमुने तपासणीकरिता पाठविले आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या तीन डॉक्टर, ४ कर्मचारी व नातेवाइकांसह दहा जणांना ‘होम क्वारंटाइन’ केले आहे. हा रुग्ण सध्या पालघर येथे उपचार घेत आहे.