वसईमध्ये ७,२८६ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 01:00 AM2020-07-27T01:00:21+5:302020-07-27T01:00:30+5:30

जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती : जीवघेण्या आजारातून बरे झालेल्यांचा सकारात्मक संदेश

7,286 patients corona free in Vasai | वसईमध्ये ७,२८६ रुग्ण कोरोनामुक्त

वसईमध्ये ७,२८६ रुग्ण कोरोनामुक्त

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : वसई-विरार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र त्याच वेळी शहरातील ७ हजार २८६ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्यामुळे सकारात्मक संदेशही मिळाला आहे. जगण्याची इच्छाशक्ती असेल तर कोरोनावर सहज मात करता येते, हेच या बरे झालेल्या रुग्णांनी दाखवून दिले आहे.
वसई-विरारमध्ये कोरोना-बाधितांचा वाढता आकडा पाहता स्थिती चिंताजनक आहे. त्यात मागील चार-पाच दिवसांत ३२ जणांचा मृत्यू झाल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. शनिवारी शहरात १८३, तर रविवारी १९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रविवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण रुग्णांची संख्या ११ हजार १९० वर पोहोचली आहे. त्याच वेळी आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २२७ इतकी झाली आहे, तर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या सात हजार २८६ इतकी असून तीन हजार ६७७ रुग्ण उपचार घेत आहेत. यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.
दुसरीकडे वसई-विरार पालिकेला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मागील चार-पाच दिवसांत महापालिका हद्दीत ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सद्यस्थितीत ११ हजारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेला आहे.
महापालिका परिसरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सव्वादोनशेच्या पुढे गेला आहे. यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव चिंताजनक असून महापालिका प्रशासन कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात कमी पडत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, महापालिका परिसरात कोरोनाने शिरकाव केला तरी वसई तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रांना त्याची झळ बसली नव्हती, मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाला थोपवून धरण्यात यश मिळवलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रांतही कोरोनाने शिरकाव केला आहे. ग्रामीण भागातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीत आता बाधितांचा आकडा ५०० च्या पुढे गेला आहे. तसेच अद्यापपर्यंत ग्रामीण भागात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ग्रामीण भागात झपाट्याने संक्रमण
पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. पालघर तालुक्यातील रुग्णांनी एक हजार‘चा तर वसईच्या ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांनी ५०० चा टप्पा ओलांडला आहे. रविवारी दुपारपर्यंतच्या अहवालानुसार, पालघर तालुक्यामध्ये १०४३ रुग्ण, तर वसईच्या ग्रामीण भागात ५१२ जणांना कोरोनाने बाधित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पालघर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये डहाणू ४६२, जव्हार १७३, मोखाडा ४३, तलासरी ८९, विक्रमगड १३७, वाडा ३६७ रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये आढळलेल्या एकूण २८२६ रुग्णांपैकी २०८८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे, तर ६९८ रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत.

Web Title: 7,286 patients corona free in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.