वसई विरार शहरात 8 मृत्यू; दिवसभरात 146 नवे रूग्ण, तर 183 रुग्ण मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 08:04 PM2020-08-26T20:04:36+5:302020-08-26T20:04:41+5:30
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका हद्दीत आता एकूण रूग्ण संख्या 16 हजार 077 वर पोहोचली आहे.
Next
वसई: वसई विरार शहरात बुधवारी दिवसभरात सर्वाधिक 8 रुग्णाचा मृत्यू झाला असून ही बाब चिंतेची आहे, तरी दिवसभरात 146 नवे रूग्ण आढळून आले व सर्वाधिक असे 183 रूग्ण मुक्त झाल्याची माहिती महापालिकेने दिली.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका हद्दीत आता एकूण रूग्ण संख्या 16 हजार 077 वर पोहोचली आहे. तर शहरात आतापर्यंत एकूण मुक्त रूग्णसंख्या 13 हजार 844 इतकी झाली आहे. तर महापालिका हद्दीतील मृतांची संख्या आता एकूण 342 वर पोहचली असून शहरात विविध रुग्णालयात आता केवळ 1 हजार 891 रूग्ण उपचार घेत असल्यामुळे आता ही आकडेवारी वसई विरार शहराला कोरोना मुक्तीकडे नेत असल्याचे संकेत दिसत आहेत.