विरार-डहाणू दरम्यान होणार ८ नवी स्थानके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:24 AM2018-07-07T00:24:23+5:302018-07-07T00:24:31+5:30
बोरीवली ते विरार पट्ट्यातील गर्दी कमी करण्यासाठी त्या भागाचे चौपदरीकरण झाले, पण त्यातून विरार-डहाणूदरम्यानच्या प्रवाशांचे प्रश्न कमी झाले नाहीत. त्यांचे हाल संपले नाहीत.
विरार : बोरीवली ते विरार पट्ट्यातील गर्दी कमी करण्यासाठी त्या भागाचे चौपदरीकरण झाले, पण त्यातून विरार-डहाणूदरम्यानच्या प्रवाशांचे प्रश्न कमी झाले नाहीत. त्यांचे हाल संपले नाहीत. आता साडेतीन हजार कोटी खर्चून होणाऱ्या चौपदरीकरणातून विरार-डहाणूच्या प्रवाशांची असह्य गर्दीतून सुटका व्हायला हवी. तशीच तशीच लोकलची गती वाढली, तर वेळेचीही बचत होईल. या मार्गावर विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वाणगाव, डहाणू रोड स्थानके आहेत. त्यातील अंतर ८ ते १२ कि.मी. असल्याने चौपदरीकरणादरम्यान वैतरणा-सफाळेमध्ये दोन, सफाळे-केळवेदरम्यान एक, केळवे-पालघरमध्ये एक, पालघर-उमरोलीमध्ये एक, उमरोली-बोईसरमध्ये एक, बोईसर-वाणगावमध्ये एक, वाणगाव-डहाणू रोडदरम्यान एक अशी आठ नवी स्थानके बांधली जाणार आहेत. वाधवी, सारतोडी, माकुणसार, चिंतुपाडा, खराळे रोड, पांचाली, वंजारवाडा, बीएसईएस कॉलनी अशी त्यांची नावे आहेत.
कालमर्यादेतच हा प्रकल्प केला जाईल पूर्ण
एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी ‘गोपनीयतेच्या’ अटीवर सांगितले की, जागतिक बँक आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ यांची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत विरार-डहाणू रोड प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेससह मालवाहतुकीला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या पट्ट्यात नवीन रेल्वेस्थानके आल्याने शहरीकरणात ही वाढ होईल, परिणामी, मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प-३ मधील विरार-डहाणू रोड प्रकल्पाला निधी पुरवण्याबाबत जागतिक बँक आग्रही असल्याचे सांगितले. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर विरार-डहाणू रोड प्रकल्पाचा मंजूर आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा प्रकल्प डेडलाइनमध्येच पूर्ण करण्यात येईल.
गुजराती जाहिराती नको
दिवा-वसई, विरार-डहाणू, डोंबिवली-बोइसरदरम्यान धावणाºया शटल प्रसंगी सुरतपर्यंत जातात; पण या शटलमध्ये गुजरात सरकारच्या योजना, त्यांच्या कामगिरीच्या जाहिराती असतात. त्यामुळे गुजरातीतील जाहिराती सतत नजरेला पडतात. त्या टाळणे रेल्वेला सहज शक्य आहे.
मेमूची गती वाढवा
सध्या विरार-डहाणूदरम्यान धावणाºया मेमू गाड्यांची गती वाढवली तरी प्रवाशांना दिलासा मिळेल. या गाड्यांच्या प्रवासाचा अवधी कमी झाला, तरी विरारहून ज्यांना बोरीवली, अंधेरी, र्चगेटला जायचे आहे त्यांच्या एकंदर वेळत बचत होईल.
फेºया वाढवा
विरार-डहाणूदरम्यान सध्या असलेल्या शटलच्या फेºया वाढवण्याची गरज आहे. विरार, डहाणू, बोरीवली, अंधेरीतून गर्दीच्या वेळेत फेºया वाढल्यास त्याचा फायदा होईल.
- विरार-डहाणू ६४ कि.मी.चे चौपदरीकरण एमयूटीपी-३ अंतर्गत २०२३ ला पूर्ण करण्यात येईल,असे एमआरव्हीसी सांगत आहे; पण मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या चौपदरीकरणाआधी म्हणजे २०२२ला धावण्याचे उद्दिष्ट गाठण्यात येईल. आज डहाणू लोकलच्या फेºया वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वेकडे लोहमार्ग रिकामा नसतो, रॅक उपलब्ध नाही, अशी अनेक कारणे दिली जातात. हे चौपदरीकरण होण्यापूर्वी प. रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसाठी ज्याप्रमाणे २००८पर्यंत विरार-बोरीवली दोनच लोहमार्ग असतानाही या मार्गावरून मेल, मालगाड्या आणि लोकलही धावत होत्या. तशाच प्रकारे या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध करून द्यावी. कारण त्या वेळी बोरीवली ते विरार दरम्यान लोकलच्या दिवसाला अप-२०० आणि डाउन -२०० फेºया होत असत. हे पाहिल्यास डहाणू-विरार येथेही दोनच लोहमार्ग असताना फक्त अप-२८ आणि डाउन-२८ लोकल, मेमू, पॅसेंजर मिळून ५६ फेºया होत आहेत. त्यामुळे डहाणू विभागासाठी कमीत कमी ५०-५० किंवा अर्ध्या तासाने लोकल धावतील, असे वेळपत्रकाचे नियोजन करायला हवे. - दयानंद पाटील, सचिव, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था
मुंबई वाहतूक प्रकल्पाच्या तिसºया टप्प्यात ‘विरार-डहाणू’ मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी जरी मिळाली असली, तरी प्रत्यक्षात मात्र या मार्गावर कामकाज होताना दिसत नाही. सध्या विरार-डहाणू व डहाणू-विरार अशा मोजक्याच गाड्या कार्यरत आहेत. म्हणून प्रवाशांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. प्रत्येक ट्रेन हाउसफूल असते. सर्वांचे हाल होत आहेत. तोबा गर्दीच्या वेळी डहाणूकर डहाणूच्या गाडीत विरारकरांना चढूच देत नाहीत. काही दिवसांपूर्वी यावरून मारहाणही झाली होती. काहींना पोलिसांनी अटकही केली होती. हे टाळण्यासाठी या मार्गावर तातडीने चौपदरीकरणाचे काम सुरू होणे अत्यावश्यक आहे. निदान त्यामुळे तरी विरार-डहाणूकरांचे दुखणे दूर होईल, हे मात्र खरे.
- प्रमोद पावस्कर, विरार