मनोरमध्ये ८ हजार लोकांनी दारू सोडली
By admin | Published: October 14, 2015 02:18 AM2015-10-14T02:18:40+5:302015-10-14T02:18:40+5:30
मनोर पोलीस ठाणे परिसरात व्यसनमुक्ती होण्यासाठी चाफेकर महाविद्यालयात प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. विजय वेरखंडे यांनी मार्गदर्शन केले.
मनोर : मनोर पोलीस ठाणे परिसरात व्यसनमुक्ती होण्यासाठी चाफेकर महाविद्यालयात प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. विजय वेरखंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पालघर जिल्ह्णात आतापर्यंत ८ हजार लोकांनी दारू सोडली असून ते व्यसनमुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मनोर परिसरातील हजारो ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
दारू पिण्याने शरीर निकामी होते, पैसा जातो, घरात तसेच बाहेर भांडणे होतात. घरातील वातावरण अशांत होते. मुलांच्या शिक्षणावर व संस्कारावर विपरीत परिणाम होत असल्याचे वेरखंडे यांनी सांगितले. त्यामुळेच व्यसनमुक्त व्हा आणि चांगले जीवन जगा आणि आपल्या कुटूंबीयांनाही जगु द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी सहा. पो. नि. मारोती पाटील यांनीही व्यसनमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले. या शिबीरात महिला दक्षता कमीटीचे सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी, शिक्षक वर्ग व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)