पाम गावाच्या हद्दीतून ८०० गुरे गेली चोरीस, सीसीटीव्हीत झाले रेकॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:11 AM2017-11-22T03:11:39+5:302017-11-22T03:11:48+5:30
पालघर : पाम ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातून सुमारे ८०० गुरे चोरीला गेली असून ही टोळी सीसीटीव्ही टीव्ही मध्ये कैद झाल्याने सातपाटी सागरी पोलिसांनी तिचा त्वरित छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
हितेन नाईक
पालघर : पाम ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातून सुमारे ८०० गुरे चोरीला गेली असून ही टोळी सीसीटीव्ही टीव्ही मध्ये कैद झाल्याने सातपाटी सागरी पोलिसांनी तिचा त्वरित छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
बोईसर जवळील व सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाम गावात शेतकºयांची गुरे चोरण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.चंद्रकांत पिंपळे ह्यांची गुरे अनेक दिवसांपासून गोठ्यात आली नसल्याने सर्वत्र शोध घेऊनही त्यांना ती आढळून आली नाहीत. त्यांनी पाम ग्रामपंचायती चे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ११ नोव्हेंबर रोजी रात्री १२.१५ वाजता एक स्कॉर्पिओ गाडीतून एक व्यक्ती खाली उतरते आणि रस्त्यात बसलेल्या गुरांना इंजेक्शन टोचून गाडीत बसून निघून जाते.काही वेळाने पुन्हा ती गाडी येते त्यातून तोंडाला फडके बांधून चार इसम उतरतात आणि अर्धमेल्या अवस्थेत निपचित पडलेल्या ४ गुरांना घेऊन गाडी निघून जाते. ही घटना पिंपळे ह्यांनी १६ नोव्हेंबर रोजीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्या नंतर समजली. ह्याचाच अर्थ पाम ग्रामपंचायती कडून दररोज सीसीटीव्ही तपासले जात नसल्याचे सिद्ध होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया पाम गावाला तक्र ार दाखल करण्यासाठी ३० किलोमीटर्स चा वळसा घालून सातपाटीला जावे लागते. तर दुसरी कडे पाम गाव बोईसर पोलीस स्टेशन पासून अवघ्या २ किलोमीटवर आहे.त्यामुळे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावांची रचना, भौगोलिक परिस्थिती नुसार करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
>गुरे नेली कत्तलखान्यात?
गुरे चोरीच्या घटनांत होणारी वाढ वेळीच रोखून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाची नोंद सातपाटी सागरी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली. गुरे चोरीची पद्धत पाहता त्यांना कत्तलखान्यात नेल्याचे जाणवते आहे.