समितीसाठी ९५ अर्ज
By admin | Published: June 17, 2016 12:50 AM2016-06-17T00:50:50+5:302016-06-17T00:50:50+5:30
पालघरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी ९५ अर्ज दाखल झाले आहेत. सेवा सहकारी संस्था गटातून ११ जागांसाठी ६५, सर्वसाधारण ७ जागा साठी
पालघर : पालघरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी ९५ अर्ज दाखल झाले आहेत.
सेवा सहकारी संस्था गटातून ११ जागांसाठी ६५, सर्वसाधारण ७ जागा साठी ३६, महिलांसाठीच्या २ जागांसाठी १०, इतर मागासवर्गीय १ जागेसाठी १२, अनुसूचित जमातीच्या १ जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले.
ग्रामपंचायत गटातून ४ जागासाठी २२, सर्वसाधारण २ जागासाठी १४, अनुसुुचित जाती जमातीच्या १ जागासाठी ६, इतर मागासवर्गीयांच्या १ जागेसाठी ३, व्यापारी गटातून २ जागांसाठी ८ अर्ज दाखल झाले. सेवा सहकारीसंस्था साठी ११ जागा असून ५२ सेवा सहकारी संस्थाचे ५६१ मतदार आहेत. तर ग्रामपंचायत गटासाठी चार जागा असून तालुक्यातील १२९ ग्रामपंचायतीमधून ११६८ मतदार आहेत. व्यापारी गटासाठी २ जागासाठी २६४ मतदार आहेत. पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे क्षेत्र मर्यादीत राहिले असून बाजर कर वसुलीचे नाके मर्यादीत झाल्याने उत्पन्नचे स्त्रोतही घटले आहे.पूर्वी बाजार कर नाक्यातील वसुलीच मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता व्यवस्थापनाकडून सेसच्या मार्गाने मिळणारे असे काही मर्यादीत स्वरूपाचे उत्पन्नाचे साधन उरले आहे.
तरीही या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षामध्ये मोठी अहमीका लागल्याचे दिसून येत आहे.
(वार्ताहर)