रद्द झालेली बांधकाम परवानगी व नोंदणी न करण्याचे कळवून देखील सदनिका विकून नोंदणी करणाऱ्या विकासक,  सहजिल्हा निबंधक आदींवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 03:19 PM2023-07-01T15:19:48+5:302023-07-01T15:20:09+5:30

पोलीस पुढील तपास करत आहेत . रवी बिल्डर हा वादग्रस्त असून त्याच्या वर अनेक गुन्हे व तक्रारी दाखल आहेत . 

A case has been filed against Ravi developers, district registrars, etc., who sold and registered flats even after informing them of the canceled building permit and non-registration. | रद्द झालेली बांधकाम परवानगी व नोंदणी न करण्याचे कळवून देखील सदनिका विकून नोंदणी करणाऱ्या विकासक,  सहजिल्हा निबंधक आदींवर गुन्हा दाखल 

रद्द झालेली बांधकाम परवानगी व नोंदणी न करण्याचे कळवून देखील सदनिका विकून नोंदणी करणाऱ्या विकासक,  सहजिल्हा निबंधक आदींवर गुन्हा दाखल 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - महापालिकेने इमारतीची बांधकाम परवानगी रद्द करून सदनिका नोंदणीकृत करू नये असे कळवून देखील विकासकाने सदनिका विकल्या व नोंदणी केल्या प्रकरणी वादग्रस्त रवी बिल्डर, तत्कालीन जिल्हा सह निबंधक अश्या एकूण ७ जणांवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

मीरारोडच्या विजयपार्क भागात राहणारे फिर्यादी अजेंद्र जोशी हे खाजगी शिकवणी घेतात तर पत्नी अश्मी ह्या शिक्षिका आहे . फेसबुकवर २०२१ साली ४८ लाखात २ बीएचके फ्लॅटची जाहिरात पाहून त्यांनी एजंट मार्फत गौरव व्हॅली येथील गौरव ऍस्टर ह्या रवी बिल्डरच्या इमारतीत ४६ लाख १० हजार देऊन फ्लॅट खरेदी केला . 

जोशी हे फ्लॅटची पाहणी करण्यासाठी इमारतीत गेले असता काही जणां कडून माहिती मिळाली कि ,  महापालिका आयुक्तांनी जून २०१९ मध्ये इमारतीची बांधकाम परवानगी रद्द केल्याचे समजले . तसेच नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून सदर इमारतीतील सदनिकांची नोंदणी करू नये असे पत्र सह जिल्हा निबंधक यांना आयुक्तांनी दिले होते . तरी देखील जोशी यांना सदनिका विकली व नोंदणीकृत करून दिली .  

१ जुलै रोजी जोशी यांच्या फिर्यादी वरून त्यांना सदनिका विकून फसवणूक केल्या प्रकरणी बिल्डर रवी शाह , केतन ठोकरशी , सोनल शाह , सेल्स व्यवस्थापक रवींद्र राणा , अधिकारपत्र धारक मच्छिन्द्र सामंत , वास्तुविशारद अनिष अँड असोसिएट्स व तत्कालीन सह जिल्हा निबंधक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस पुढील तपास करत आहेत . रवी बिल्डर हा वादग्रस्त असून त्याच्या वर अनेक गुन्हे व तक्रारी दाखल आहेत . 

Web Title: A case has been filed against Ravi developers, district registrars, etc., who sold and registered flats even after informing them of the canceled building permit and non-registration.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.