मीरारोडमध्ये ११ बेकायदा बॅनर बाजांवर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Published: December 2, 2023 07:31 PM2023-12-02T19:31:21+5:302023-12-02T19:31:38+5:30

मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात बेकायदा बॅनर लावणाऱ्या ११ बॅनरबाजांवर महापालिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered against 11 illegal banner hawkers in Mira Road | मीरारोडमध्ये ११ बेकायदा बॅनर बाजांवर गुन्हा दाखल 

मीरारोडमध्ये ११ बेकायदा बॅनर बाजांवर गुन्हा दाखल 

मीरारोड : मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात बेकायदा बॅनर लावणाऱ्या ११ बॅनरबाजांवर महापालिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरारोड प्रभाग समिती ५ मधील कर निरीक्षक संपत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून १ डिसेम्बर च्या रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चव्हाण हे कर्मचाऱ्यांसह बेकायदा बॅनर लागल्या बाबतची पाहणी करत होते. 

त्यावेळी भोजपुरी फिल्म परदेशी बलमा चे ८ बॅनर सह रिझवान मुस्लिम रिश्ते, दारू सोडवा, प्रे स्कुल प्राईम स्कुल, स्वराज अकेडमी, टेलर कर्मचारी पाहिजे, पोलीस भरती, घरी बसल्या काम, किंडर ब्लँड प्ले ग्रुप नर्सरी, क्रेडिट कार्ड ने पैसे घ्या, बजाज व एम आय कार्ड अश्या आशयाच्या वाणिज्य स्वरूपाच्या जाहिराती  फलक मीरारोड भागात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीपणे लावलेल्या होत्या. त्या प्रकरणी ११ अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जात आहे. 

Web Title: A case has been registered against 11 illegal banner hawkers in Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.