भाईंदर मधील धोकादायक फटाका विक्री स्टॉलवर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Published: October 26, 2022 02:35 PM2022-10-26T14:35:33+5:302022-10-26T14:36:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  मिरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने मंगळवारी भाईंदर येथील एका फटाके स्टॉलचा माल जप्त करत ...

A case has been registered against a dangerous firecracker stall in Bhayander | भाईंदर मधील धोकादायक फटाका विक्री स्टॉलवर गुन्हा दाखल 

भाईंदर मधील धोकादायक फटाका विक्री स्टॉलवर गुन्हा दाखल 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मिरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने मंगळवारी भाईंदर येथील एका फटाके स्टॉलचा माल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक नाका येथे स्व . प्रफुल्ल पाटील चौक भागात स्वामी समर्थ फायर वर्क्स ला अग्निशमन दलाने १४ ऑक्टोबर रोजी फटाका स्टॉल साठी नाहरकत दाखला दिला होता. परंतु सदर स्टॉल प्रकरणी तक्रारी आल्यावर मंगळवारी अग्निशमन दलाने स्थळ पाहणी केली असता विक्रेत्याने फटाका स्टॉल मंजुरीच्या बाहेर जाऊन चक्क महापालिकेच्या पदपथ वर आणला होता . त्यामुळे मुख्य रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला . 

विक्रेत्याने अटीशर्तींचे उल्लंघन केल्याने अग्निशमन दलाने परवाना रद्द करत त्याचा माल जप्त करण्याची कार्यवाही केली .  त्या नंतर अग्निशमन केंद्र अधिकारी दिलीप रणावरे यांच्या फिर्यादी वरून फटाका स्टॉल मधील विक्रेते सेल्वराज षणमुगम व जितेंद्र गडकर ह्या दोघांवर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

फटाका विक्रेता आरोपी आहे याचिकाकर्ता 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदीं विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारा सेल्वराज षणमुगम हा भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो . सेल्वराज हा अटीशर्तींचे उल्लंघन करून लोकांच्या जीवितास धोका होईल या पद्धतीने फटाके विक्री करत होता म्हणून त्याच्यावर अग्निशमन दलाने गुन्हा दाखल केल्याने  सेल्वराज याची अडचण वाढण्याची शक्यता आहे .

Web Title: A case has been registered against a dangerous firecracker stall in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.