अपर तहसीलदारासह पाच जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 09:42 AM2024-04-14T09:42:42+5:302024-04-14T09:42:46+5:30
विकासक तुफेल यांनी तक्रार केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: घोडबंदर येथील एका औद्योगिक वसाहत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जमिनीच्या मालकी हक्काच्या अनुषंगाने बनावट स्वाक्षरी आणि अर्जाद्वारे तत्कालीन अपर तहसीलदार यांच्याकडून अकृषिक करनिश्चिती आदेश मिळवून तसा फेरफार करून घेतल्याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह तत्कालीन अपर तहसीलदार यांच्यावर एका विकासकाच्या फिर्यादीवरून १२ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.
विकासक तुफेल राही यांच्या फिर्यादीनुसार, मीरारोडच्या हाटकेश उद्योगनगर भागातील मौजे घोडबंदर येथील सर्व्हे क्र. ९८/३ ही जमीन त्यांच्या मालकीची आहे. या जमिनीचा अगोदरच अकृषिक आदेश झालेले असतानाही विकासक परेश व्होरा यांच्या बनावट सहीचा अकृषिक अर्ज तयार करून तत्कालीन अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्याकडे केला होता. सप्टेंबर २०२० मध्ये देशमुख
यांनी त्या अर्जाच्या आधारे अकृषिक
यांच्यावर झाली कारवाई
विकासक तुफेल यांनी तक्रार केली होती. त्यानंतर काशीगाव पोलिसांनी १२ एप्रिल रोजी इंडस्ट्रीयल प्रिमायसेस संस्थेचे पदाधिकारी मुकुंद दोडीया, प्रतीक सेठ, परेश कडकीया, विजय चंदराणा व इतर सभासद तसेच तत्कालीन अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आधीच अकृषिक आदेश झालेला असतानाही औद्योगिक वसाहत संस्थेच्या पदाधिकारी यांनी जमिनीचे मालकी हक्क निर्माण करण्याकरिता हा प्रकार केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान पालवे हे तपास करत आहेत. कर आकारणी निश्चिती करून तसा आदेश दिला. त्यानुसार घोडबंदर तलाठी यांनी फेरफार नोंद केली होती.