भाजपच्या माजी नगरसेविकाला मारहाण, शिवीगाळ करत कोंडून ठेवल्याने नवऱ्यावर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Published: February 26, 2023 07:28 PM2023-02-26T19:28:51+5:302023-02-26T19:29:21+5:30

भाजपच्या माजी नगरसेविकाला मारहाण, शिवीगाळ करत कोंडून ठेवल्याने नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 A case has been registered against the husband for beating and abusing the former corporator of BJP   | भाजपच्या माजी नगरसेविकाला मारहाण, शिवीगाळ करत कोंडून ठेवल्याने नवऱ्यावर गुन्हा दाखल 

भाजपच्या माजी नगरसेविकाला मारहाण, शिवीगाळ करत कोंडून ठेवल्याने नवऱ्यावर गुन्हा दाखल 

googlenewsNext

मीरारोड : भाजपा कार्यकर्ता नवऱ्याचे अनैतिक संबंध व तरुणीचे अश्लील छायाचित्र मोबाईल मध्ये सापडल्याने जाब विचारणाऱ्या पत्नी तथा भाजपाच्या माजी नगरसेविकेला मारहाण, शिवीगाळ करत नवऱ्याने कोंडून ठेवले. मानसिक व शारीरिक छळ केला म्हणून पत्नीच्या तक्रारी नंतर पोलिसांनी नवऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदर पुर्व भागातील भाजपच्या माजी नगरसेविका मेघना रावल (३१) यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी पती दीपक रावल वर गुन्हा दाखल केला आहे. मेघना ह्या नगरसेविका असताना २०२० सालात पती दिपकचे बाहेरील तरुणीशी फोन वर सातत्याने बोलत असल्याचे आढळले. मेघना यांनी पतीचा मोबाईल तपासला असता त्यात तरुणीचे अश्लील फोटो दिसले. मेघना यांनी जाब विचारला असता दिपकने त्यांना शिविगाळ व मारहाण केली. त्या नंतर सातत्याने दीपक हा वाद घालून मेघना यांना शिवीगाळी,  मारहाण  करू लागला.  मेघना यांना कोणत्याही कार्यक्रमासाठी दीपक जाऊ देत नव्हता व दमदाटी करत होता. 

२३ फेब्रुवारीच्या रात्री १० च्या सुमारास दिपक घरी आला व मेघना यांना मिसळ बनवून देण्यास सांगितले.  घरात मिसळ साठी लागणारे फरसाण -  चिवडा नसल्याने मेघना यांनी शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या  नणंद शैला रावल यांना कॉल करून तिच्याकडे फरसाण - चिवडा असेल तर दे सांगितले. त्याचा राग येऊनने दीपक रावल मेघना यांना शिविगाळ करत  ठोश्याबुक्यांनी मारहाण केली. त्यांना घरातून हाकलून देण्याची धमकी देत घरातील स्वयंपाक घरात बंदिस्त करून ठेवले.

थोड्यावेळाने शैला घरी आल्या असता त्यांनी मेघना यांची सुटका केली.  पती दीपक ने सातत्याने शिविगाळ, मारहाण करून शारिरीक व मानसिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिल्याची फिर्याद मेघना यांनी दिल्याने नवघर पोलिसांनी दीपक रावल वर २४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


 

Web Title:  A case has been registered against the husband for beating and abusing the former corporator of BJP  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.