मीरारोडमध्ये कांदळवनाच ऱ्हास करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Published: November 5, 2023 07:32 PM2023-11-05T19:32:55+5:302023-11-05T19:33:13+5:30

भूमाफियांनी कांदळवनात भरणी करून कांदळवनाची तोड केल्याची तक्रार वसुंधरा संस्थेच्या अमजद खान यांनी केली होती.

A case has been registered against those who destroyed the Kandalvan in Mira Road | मीरारोडमध्ये कांदळवनाच ऱ्हास करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

मीरारोडमध्ये कांदळवनाच ऱ्हास करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

मीरारोड - मीरारोड जाफरी खाडीच्या पात्र परिसरात कांदळवन क्षेत्रात भरणी करून सपाटीकरण, भिंती बांधून झोपड्या केल्याप्रकरणी तलाठी यांच्या फिर्यादी वरून नया नगर पोलिसांनी ७ जणांवर पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. भूमाफियांनी कांदळवनात भरणी करून कांदळवनाची तोड केल्याची तक्रार वसुंधरा संस्थेच्या अमजद खान यांनी केली होती. १ ऑगस्ट रोजी स्थळपाहणी करण्यात आली असता शांती नगर सेक्टरच्या मागे मौजे. पेणकर पाडा सर्व्हे क्र . नविन ३८ / २ या जागेवर  कांदळवनची तोड करत पत्र्याचे कुपंण , दगड मातीचा भराव टाकुन जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण व विटांच्या भिंती बाधुन तीन - चार झोपड्या बांधल्याचे आढळले . येथे अविसिनिया मरीना या प्रजातीची झाडे आहेत. 

सातबारा उताऱ्यावरील जमीन मालक जालिंदर पाटील, प्रमिला पाटील, भारती पाटील, रंजना पासे, रवींद्र  पाटील, वत्सला म्हात्रे, शकुतंला पाटील यांच्यावर कांदळवनाचा -हास केल्या बद्दल तलाठी वंदना आव्हाड यांच्या फिर्यादी वरून नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे .

Web Title: A case has been registered against those who destroyed the Kandalvan in Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.