शॉर्ट सर्किटमुळे घरातील टीव्हीचा स्फोट; ८ वर्षीय मुलगा घरात एकटा असताना घडली घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:26 PM2022-08-07T19:26:09+5:302022-08-07T19:26:34+5:30

Short Circuit : नालासोपाऱ्याच्या विजय नगर परीसरातील घटना 

A home TV explodes due to a short circuit; The incident took place when the 8-year-old boy was alone at home | शॉर्ट सर्किटमुळे घरातील टीव्हीचा स्फोट; ८ वर्षीय मुलगा घरात एकटा असताना घडली घटना 

शॉर्ट सर्किटमुळे घरातील टीव्हीचा स्फोट; ८ वर्षीय मुलगा घरात एकटा असताना घडली घटना 

Next

नालासोपारा (मंगेश कराळे) :- विजय नगर येथील एका घरात शॉर्ट सर्किटने टीव्ही जळाल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेत घरात कुलूप बंद अवस्थेत असलेल्या ८ वर्षीय मुलाचे प्राण वाचवण्यात यश आले. शिवधाम बिल्डींगमध्ये भाडे तत्वावर गोविंद विश्वकर्मा हे आपल्या कुटुंबासह राहतात. रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी आपल्या ८ वर्षीय मुलाला घरात लॉक करून बाहेर गेल्या होत्या.

यावेळी त्यांचा मुलगा मोबाईलवर खेळत होता. मात्र टीव्हीचे कनेक्शन सुरू असल्याने त्यांच्या टिव्हीत अचानक शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला व घरात धूरच धूर पसरला. घरातील मुलाने खिडकीतून आरडा ओरड करून रहिवाशांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी प्रसंगावधन दाखवत घराचे कुलूप तोडले व मुलाची सुटका केली. या घटनेत टीव्ही व घरातील वायरिंगचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिस व अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहचून या घटनेची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.

Web Title: A home TV explodes due to a short circuit; The incident took place when the 8-year-old boy was alone at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.