जागेमुळे अंगणवाडीचा तिढा

By admin | Published: March 31, 2017 05:26 AM2017-03-31T05:26:59+5:302017-03-31T05:26:59+5:30

पर्यायी जागेची अट घातल्याने भिनारी शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत बांधणीच्या मुद्यावरून ग्रामस्थ विरूद्ध

Aanganwadi titha due to the awakening | जागेमुळे अंगणवाडीचा तिढा

जागेमुळे अंगणवाडीचा तिढा

Next

बोर्डी : पर्यायी जागेची अट घातल्याने भिनारी शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत बांधणीच्या मुद्यावरून ग्रामस्थ विरूद्ध जमीनमालक हा तिढा वाढला आहे. दरम्यान अंगणवाडी कोणत्या जागेत उभी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डहाणू तालुक्यातील जाम्बुगाव ग्रामपंचायतीअंतर्गत भिनारी शिंगडपाडा येथील मोडकळीस आलेल्या अंगणवाडीच्या इमारत नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करण्यापूर्वी जमीनमालक व ग्रामस्थ यामध्ये वाद निर्माण झाला असून ग्रामस्थांना जुन्या जागेवर अंगणवाडी हवी आहे. मात्र, जमिनीच्या वारसदारांची या बाबत हरकत आहे. अंगणवाडीची वादग्रस्त जमीन कै. धीरजलाल जव्हेरचंद्र शहा यांच्या नावे असून मयोद शहा यांच्यासह आणखी आठ वारस आहेत. येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद भिनारी शाळेच्या उभारणीस १९८१ साली धिराजलाल यांनी तोंडी परवानगीने दानपत्र न करता जमीन दिल्याचे मयोद शहा यांचे म्हणणे आहे. सर्व्हे नं. ४०३ व ४०५ या जमिनीवर अतिक्रमण करून बोअरवेल आणि समाजमंदिर बांधण्यात आले असून ग्रामपंचायतीने जमीनमालकाची परवानगी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित जमिनीवर अंगणवाडी इमारत बांधण्याचा अट्टाहास असेल, तर शहा कुटुंबाची याबाबत हरकत आहे. मात्र, अन्य ठिकाणी मालकीच्या जागेत अंगणवाडीला विनामूल्य जमीन देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.(वार्ताहर)

‘१९८१ साली वडिलांनी शाळेसाठी जमीन देताना तोंडी परवानगी दिली होती. मात्र, दानपत्र केले नव्हते. विवादित जागे व्यतिरिक्त अंगणवाडीकरिता मालकीची अन्य जागा विनामूल्य उपलब्ध करण्यास तयार आहोत’
- मयोद शहा
(तक्र ारदार)

Web Title: Aanganwadi titha due to the awakening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.