अ.पो. अधीक्षक कार्यालयाला आय.एस.ओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 06:01 AM2018-11-16T06:01:16+5:302018-11-16T06:01:50+5:30

उत्तम आणि दर्जेदार उत्पादन करणाºया कंपन्यांना आयएसओ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन दिले जात होते.

Aapo Superintendent's office receives ISO number | अ.पो. अधीक्षक कार्यालयाला आय.एस.ओ मानांकन

अ.पो. अधीक्षक कार्यालयाला आय.एस.ओ मानांकन

Next

वसई : येथील अप्पर पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयास आता आयएसओ मानांकन मिळाले आहे. असा मान मिळविणारे हे जिल्हातील पहिले पोलीस कार्यालय ठरले आहे. विविध १४ निकषांवर आधारित असे हे प्रमाणपत्र या कार्यालयाला मिळाले आहे. या कार्यालयाला स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, नियोजन, कामाची गती या विविध निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

उत्तम आणि दर्जेदार उत्पादन करणाºया कंपन्यांना आयएसओ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन दिले जात होते. ते आता सेवा देणाºया संस्थांनाही देण्यात येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच सर्व संस्थांना चांगले काम करून आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्याचे आवाहन केले होते. वसईतील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या कार्यालयला आयएसओ 9001:2015 हे प्रमाणपत्र मिळाले आहे. अशी माहिती आयएसओ संस्थेचे महाराष्ट्र आणि गुजराथचे लीड आॅडीटर प्रमोद पाटील यांनी दिली. यासाठी तीन वेळा कार्यालयाची पाहणी करण्यात आली आणि विविध सूचना करण्यात आल्या. गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची प्रलंबित प्रकरणे ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. नागरिकांशी बोलताना पोलीस कर्मचाºयांचे वर्तन कसे आहे, नागरिकांना योग्य वागणूक मिळते का, कार्यालयातील वाहनांची स्थिती कशी आहे, प्रसाधनगृह आहे का, नागरिकांनी केलेल्या ई -मेल्सला कसा प्रतिसाद दिला जातो, नियमांचे पालन होते का, सीसीटीव्ही कॅमेरे योग्य लावण्यात आलेले आहेत का आदी १४ बाबी तपासण्यात आल्या. हे प्रमाणपत्र तीन वर्षे जारी असेल.

हे आहे टीमवर्कचे यश
च्गेल्या काही दिवसांपासून कार्यालयातील कर्मचारी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. कार्यालयात नीटनेटकेपणा आणि स्वच्छता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चेहरामोहरा बदलेला आहे.
 

Web Title: Aapo Superintendent's office receives ISO number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.