दिनेश भट यांच्या प्रेरणेतून सलग तिस-या वर्षी जव्हारला अबव्ह फोर्टी फेस्टिव्हल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:20 AM2017-10-27T03:20:13+5:302017-10-27T03:20:26+5:30
जव्हार : माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या प्रेरणेतून सलग तिसºया वर्षी अबव्ह फोर्टी फेस्टीव्हल २७, २८ व २९ आॅक्टोबर राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजण्यात आला आहे.
हुसेन मेमन
जव्हार : माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या प्रेरणेतून सलग तिस-या वर्षी अबव्ह फोर्टी फेस्टीव्हल २७, २८ व २९ आॅक्टोबर राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजण्यात आला आहे. जव्हार तालुक्यातील चाळीस वर्षांवरील क्रिकेट खेळाडूंचे पाच संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यावर्षी हा फेस्टीव्हल तीन दिवस व दोन रात्री असा होणार आहे.
या दरम्यान दिवसा क्रिकेटचे सामने व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आयोजकांनी निवडलेल्या क्रिकेटच्या पाच संघांना जव्हार संस्थान काळात होऊन गेलेल्या राजे, महाराजांची नावे देण्यास आलेली आहेत. त्यात प्रामुख्याने जव्हार संस्थान काळातील सर्वात जास्त लोकप्रिय राजे यशवंतराव मुकणे यांच्या नावाने असलेल्या यशवंत वॉरीयर्स या संघात एकूण १७ खेळाडू असतील व या संघाचे नेतृत्व जव्हार मधील मोर्चा संघाचे माजी कर्णधार सलीम मुल्ला करणार आहेत.
या फेस्टीव्हल दरम्यान दोन रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेले एकूण ९० च्या वर खेळाडू आपआपली कला सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जव्हारमधील अनिल तमोर, फिरोज शेख, इरफान शेख, नदीम चाबुकस्वार, अभिजित मुकणे, मनोज प्रभू, सचिन अंभीरे, मनीष घोलप तसेच हर्षद मेघपुरिया यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या फेस्टीव्हल साठी जव्हार तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी सहकार्य केले आहेत. महोत्सवाच्या आयोजनासाठी शहरातील मान्यवर तसेच तरुणाई आणि विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती मेहनत घेत आहेत.
>संस्थानच्या राजे-महाराजांची संघांना नावे
ंसंस्थान काळातील १७०० व्या शतकातील राजे देवबा यांच्या नावाने साकारलेल्या देवबाज चॅलेंजर्स संघाचे नेतृत्व नॅशनल संघाचे खेळाडू फिरोज शेख करणार आहेत. तसेच संस्थान काळातील कर्तृत्ववान राजे जयबा यांच्या नावाच्या जायबा फायटर या संघाचे नेतृत्व दर्यासारंग संघाचे खेळाडू मनोज प्रभू हे करणार आहेत. त्याच प्रमाणे संस्थान काळातील हुशार व लोकप्रिय राजे मल्हारराव मुकणे यांच्या नावाचाही मल्हार ब्लास्टर हा संघ असेल व त्याचे नेतृत्व दर्या सारंग संघाचे धडाकेबाज खेळाडू सचिन अंभीरे करतील. तसेच या स्पर्धेत पाचवा संघ जव्हार संस्थान काळातील महाराज मार्तंडराव मुकणे यांच्या नावाचा असेल व त्याचे नेतृत्व मोर्चा संघाचे माजी कर्णधार इरफान शेख हे करणार आहेत. या स्पर्धे करिता या वर्षी ३५ वर्षा वरील खेळाडूंनाही संधी देण्यात आलेली आहे. या स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या संघास चषक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेबद्दल संपूर्ण जिल्ह्यात मोठी उत्सुकता दिसून येते आहे.