विक्रमगडचा शैक्षणिकस्तर खालावला दहावीचा निकाल ४८.५७
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:52 AM2019-06-23T00:52:43+5:302019-06-23T00:52:59+5:30
नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालाने तालुक्याचा व खास करुन ग्रामीण भागात शैक्षणिक दर्जा खालावत चाल्याचे अधोरेखित झाले आहे.
- राहुल वाडेकर
विक्र रमगड - नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालाने तालुक्याचा व खास करुन ग्रामीण भागात शैक्षणिक दर्जा खालावत चाल्याचे अधोरेखित झाले आहे. विक्र मगड सारख्या आदिवासी तालुक्याचा केवळ ४८.५७ टक्के लागल्याने एकुणक उत्तीर्णतेचा आलेख पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने अनेक पालकांनी चिंता व्यक्त झाली आहे.
तालुक्यातील २७ शाळेतील १० वीच्या २,८८३ विद्यार्थ्यांपैकी २,८५१ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यातुन १,३८५ विद्यार्थी पास झाले तर १४६६ विद्यार्थी नापास झाले आहेत. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा नापास होणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यातही गणित आणि इंग्रजी या दोन विषयात नापास होणाऱ्यांनी संख्या अधिक आहे. तालुक्यातील खालवलेल्या शैक्षणिक गुणवत्तेला जबाबदार कोण? ही परिस्थिती सुधारणार का? असा सवाल पालक करीत आहेत.
१३ शाळांचे निकाल ५० टक्के पेक्षा खाली गेल्याने या वर्षी दहावीमध्ये गेलेल्या पाल्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. या मधे विक्र मगड हायस्कूल ४७.४४ टक्के, श्री. बी.जी. स्वजन विद्यालय, आलोंडे २५.७१ टक्के, क्रु झे विभाग हायस्कूल ४०.१५ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, तलवाडा २९.०७ टक्के, शासकीय माध्यमिक शाळा, भोपोली ४९.३६ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाला मुरबाड, विक्र मगड २८.८२ टक्के, उपराले विभाग हायस्कूल २७.९८ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा क्रु झे ३२.५५ टक्के, विद्याधन विद्या मंदिर सावरखींड, मेढी ४२.५० टक्के, वात्सल्य प्रि. अण्ड सेक. स्कूल, चाबके ३४.२८ टक्के, झे. पी प्रायमरी अण्ड सेकंडरी स्कूल - ४२.१० टक्के, झे. पी. प्रायमरी अण्ड सेकंडरी स्कूल ४१.३७ टक्के, झे. पी प्रायमरी अण्ड सेकंडरी स्कूल २५ टक्के या १३ शाळाचा निकाल ५० टक्के पेक्षा कमी लागला आहे.
या वर्षी दहावीचा अभ्यासक्र म बदला. आणि शाळेकडून दिले जाणारे गुण पद्धत ही बंद झाली आहे. त्याचा परीणाम तालुक्यातील निकालावर झाल्याने टक्केवारी कमी झाली आहे.
- भगवान मोकाशी, (गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती विक्र मगड)