विक्रमगड-वाडा रस्त्यावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:42 AM2019-02-27T00:42:21+5:302019-02-27T00:42:24+5:30

बाप-लेकीचा मृत्यू: आई आणि छोटी कन्या मात्र बचावल्यात

Accident on Vikramgad-Wada road | विक्रमगड-वाडा रस्त्यावर अपघात

विक्रमगड-वाडा रस्त्यावर अपघात

googlenewsNext

विक्र मगड : वाडा रस्त्यावरील सजन येथे समोरून येणाऱ्या भरधाव कंटनेरने कारला कट मारल्याने मोठा अपघात घडून त्यांमध्ये कल्पेश सांबरे (वय ३० वर्ष) या तरु णांचे आणि त्याची एक वर्षाची मुलगी ओवी हिचा जागीच मृत्य झाला. तर कल्पेश याची पत्नी, आई, आणि दुसऱ्या एका मुलीला दुखापत झाली आहे.


झडपोली येथून आपल्या कारने पाली-मस्तान मार्गे पालघर येथे आपल्या आईला रु ग्णालयात घेऊन जात असतांना सजन येथे आल्यानंतर समोरून भरधाव कंटेनर आपल्या गाडीवर येत असल्याचे दिसल्यानंतर वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळल्याने कल्पेश याच्या डोक्याला तर त्याच्या आठ महिन्यांच्या मुलीला गंभीर दु:खापत झाल्याने दोघांना वाडा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा हॉस्पिटलमध्ये जातांनाच त्या दोघांचा मृत्यू झाला. तर पत्नी काव्या सांबरे (२५ वर्ष) ही गंभीर जखमी असून तिला ठाणे येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर आई प्रभावती सांबरे (५५ वर्ष) आणि प्राची सांबरे (वय २ वर्ष) मुलीला किरकोळ दु:खापत झाल्याने विक्र मगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बाप-लेकीच्या मृत्युने विक्र मगड परीसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदाबाद-मुंबई मार्गे जाणारी अनेक आवजड वाहने ही टोल वाचविण्यासाठी कासा-विक्र मगड-पाली-वाडा मार्गे भिवंडी कडे जात असतात.मात्र कासा-विक्र मगड-पाली हा मार्ग अरु ंद आहे. तरीही या मार्गावरु न आवजड वाहने जात असल्याने येथे वारंवार अपघात घडतात.

Web Title: Accident on Vikramgad-Wada road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.