एकाच परिवारातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू; श्रीप्रस्थाच्या नव्या रस्त्यावर बुधवारी रात्री घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:37 PM2024-09-05T16:37:14+5:302024-09-05T16:37:34+5:30

जय अपार्टमेंटमध्ये राहणारे धीरज गोईल व हिरेन घुघल हे २० ते २५ वयोगटातील तरुण हे बुधवारी रात्री विरारवरून दुचाकीने घरी येत होते.

Accidental death of two youths from the same family; The incident took place on Wednesday night on the new road of Sriprastha | एकाच परिवारातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू; श्रीप्रस्थाच्या नव्या रस्त्यावर बुधवारी रात्री घडली घटना

एकाच परिवारातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू; श्रीप्रस्थाच्या नव्या रस्त्यावर बुधवारी रात्री घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क,

नालासोपारा (मंगेश कराळे) : हनुमान नगर परिसरातील जय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एकाच घरातील २० ते २५ वयोगटातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास श्रीप्रस्था येथील नव्या रस्त्यावर घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांच्या नातेवाईक व घरांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जय अपार्टमेंटमध्ये राहणारे धीरज गोईल व हिरेन घुघल हे २० ते २५ वयोगटातील तरुण हे बुधवारी रात्री विरारवरून दुचाकीने घरी येत होते. रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास श्रीप्रस्थाच्या नव्या बनविण्यात आलेल्या रस्त्यावरून येत असताना यशवंत गौरवकडून येणाऱ्या एका चार चाकी गाडीला जोरदार धडक देऊन अपघात घडला. या अपघातात नियंत्रण न झाल्याने दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

या अपघातानंतर या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून अनेकांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्यावर गतिरोधक व सफेद पट्टे मारण्यात यावे जेणेकरून हे अपघात होणार नाही याची दक्षता मनपाने घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: Accidental death of two youths from the same family; The incident took place on Wednesday night on the new road of Sriprastha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात