अपघात करून पळालेल्या चालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:55 PM2019-08-29T23:55:18+5:302019-08-29T23:55:21+5:30
एक अज्ञात वाहनाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जाणता राजा या धाब्याजवळून जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी रात्री भाजी विकून घरी परतणाºया रामजी जंगबाहादूर गिरी (५०) या भाजी विक्रेत्याला धडक देवून गंभीर जखमी केले होते.
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर अपघात करून पलायन केलेल्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बुधवारी रात्री बोईसर-तारापूर या मुख्य रस्त्यावरील भीमनगर येथे अचानक मृतदेहासह रास्ता रोको केला. मात्र त्यानंतर घटनास्थळी तुटून पडलेल्या नंबर प्लेटच्या तुकड्यावरु न पोलिसांनी कार शोधून काढून ताब्यात घेतली आहे.
एक अज्ञात वाहनाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जाणता राजा या धाब्याजवळून जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी रात्री भाजी विकून घरी परतणाºया रामजी जंगबाहादूर गिरी (५०) या भाजी विक्रेत्याला धडक देवून गंभीर जखमी केले होते.
रामजी यांना एमआयडीसीतील तुंगा रूग्णालयात प्रथम दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी गुजरातला नेले. मात्र उपचारादरम्यान गिरी यांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी पोलिसांनी वाहन चालकावर कारवाई करवी यासाठी मृतदेह घेऊनच रास्तारोको केल्याने तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
आरोपीचा तपास घेत असल्याचे मृतांच्या नातेवाईकांना बोईसर पोलिसांनी नातेवाईकांना सांगितले. मात्र सुरुवातीला कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नंतर काही वेळाने काही लोकप्रतिनिधी व नेते यांचेसह कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी मृतांच्या नातेवाईकांना समजवले त्यानंतर नातेवाईक मृतदेह घरी घेऊन गेले.
घटनास्थळीचा बोईसर पोलिसांनी पंचनामा केला होता तर धडक देणाºया वाहनाची नंबर प्लेट तुटून पडली होती. त्या तुटलेल्या नंबर प्लेटमध्ये तीन नंबर होते तर एक नंबर मिस झाला होता. पोलिसांनी शिताफीने १ ते ९ नंबर टाकून त्या कारचा शोध घेवून मारुती झेन ही सिल्वर रंगाची कार व चालकालाही ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला.
पोलिसांचे कौतुक
अपघाताचा कोणताही ठोस असा धागा दोरा मागे नसतांना अपघातग्रस्त गाडीच्या नंबर प्लेटचे खाली पडलेले तुकडे जुळवून त्यावरून कारचा नंबर शोधण्याची हुशारी पोलीसांनी दाखविली व तातडीने शोध घेऊन चालकाला ताब्यात घेतल्याबद्दल कौतुक होत आहे.