खुनाच्या गुन्ह्यातील ६ वर्षां पासून फरार आरोपीला विरार मधून अटक 

By धीरज परब | Published: May 11, 2023 09:04 PM2023-05-11T21:04:20+5:302023-05-11T21:04:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड - २०१६ साली झालेल्या हत्येतील आरोपीला काशीमीरा पोलिसांनी विरार येथून अटक केली आहे . सदर ...

Accused absconding for 6 years in the crime of murder arrested from Virar | खुनाच्या गुन्ह्यातील ६ वर्षां पासून फरार आरोपीला विरार मधून अटक 

खुनाच्या गुन्ह्यातील ६ वर्षां पासून फरार आरोपीला विरार मधून अटक 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - २०१६ साली झालेल्या हत्येतील आरोपीला काशीमीरा पोलिसांनी विरार येथून अटक केली आहे . सदर गुन्ह्यातील ९ आरोपीना आधीच अटक झाली होती . 

मुंबई , जोगेश्वरीतील आनंद नगर , पाटलीपुत्र कॉम्प्लेक्स मध्ये  राहणार सचिन नारायण मोहीते (२५) यांचे ३९ लाख रुपये परत देत नाही ह्या रागातून ११ जणांनी जुलै २०१६ मध्ये अपहरण केले होते . आधी त्यांना  सत्याकुमार पाणीग्रही याच्या गोरेगांव येथील कार्यालयात नेऊन मारहाण केली . नंतर काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील  आर. के. प्रिमीयम लॉजींग मधील एका खोलीत आणून मोहितेंच्या पोटावर तसेच गुप्तांगावर लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली . 

मोहिते मरण पावल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह पाणीग्रही याच्या गाडीत घालून पालघरच्या मनोर जवळील सूर्या नदीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिला होता .  मोहितेंचा मृतदेह सापडल्याने सफाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती . 

दरम्यान मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा ३ चे पोलीस निरीक्षक संजय देवराम निकुंबे यांना मोहिते यांचे अपहरण व हत्या हे पैश्यांच्या कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाल्या नंतर सफाळे पोलीस ठाण्यात २०१७ साली शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल होऊन तो काशीमीरा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता . 

हत्येच्या गुन्ह्यात सत्याकुमार भागीरथी पाणीग्रही उर्फ धिरेनकुमार पिल्ले उर्फ कुमार सह संदिप पोपट कुंभार,  कपिल प्रभाकर जाधव, मल्या जगवंदु बारीक उर्फ बाबु , अकलाक इरशाद हुसैन खान उर्फ चाँद, सुधीर मयाशंकर शुक्ला , अमिर गुलाल रसुर तांबे ऊर्फ अम्मु , सय्यद जफरहुसेन जाफर हुसेन रिझवी ,  मोहमंद राशीद मोहमंद शफिक कुरेशी ह्या ९ जणांना अटक करण्यात आली होती .  

गुन्ह्यातील ९ अटक आरोपीं विरुद्ध ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. तर प्रमोद जेना ऊर्फ निलु व  सौम्यराज खिरोद दास हे दोघे आरोपी मात्र फरार होते . हे दोन्ही आरोपी पोलिसांना सापडत नव्हते . सहायक पोलीस आयुक्त  विलास सानप व विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम, सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे सह अनिल पवार,  निलेश शिंदे, राहुल सोनकांबळे, रविंद्र कांबळे,धनश्री गुलदगडे यांनी फरार आरोपींचा शोध चालवला होता . 

त्यात सौम्यराज दास याचा सद्याचा मोबाईल क्रमांक मिळवून तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला विरार मधून अटक केली .२७ वर्षीय दास हा विरारच्या ग्लोबल सिटी मधील एव्हरशाईन संकुलात रहात होता . तो मूळचा ओरिसा राज्यातील आहे . अटक आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे संदीप कदम यांनी सांगितले . 

 

Web Title: Accused absconding for 6 years in the crime of murder arrested from Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.