गुरे चोरण्यासाठी कार चोरी करणाऱ्या आरोपीला अटक; २ गुन्ह्यांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:39 PM2024-07-16T16:39:42+5:302024-07-16T16:39:58+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश
मंगेश कराळे
गुरे चोरण्यासाठी इको कारची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी मंगळवारी दिली आहे. या आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेली कार हस्तगत करण्यात आली आहे.
सकवारच्या वरठापाडा येथे राहणारे व्यापारी विक्की ठक्कर (२९) यांची ३ लाख रुपये किंमतीची इको कार १३ जूनला रात्री त्यांच्या घराच्या आवारात पार्किंग केलेली कार चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशान्वये गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीवरून आरोपी अरबाज अतिक मिसाळ (२४) याला सोमवारी अटक केली आहे. गुन्ह्यातील चोरी केलेली ३ लाख रुपये किंमतीची ईको कार ताब्यात घेण्यात आली आहे. दोन गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपीवर यापूर्वीही वाहन व गुरे चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, आश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, यूवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबरचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.