चोरी व दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला अटक; ४ चोरीच्या दुचाकी हस्तगत, ५ गुन्ह्यांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 06:50 PM2023-09-29T18:50:03+5:302023-09-29T18:51:55+5:30
चोरी व दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
(मंगेश कराळे)
नालासोपारा : चोरी व दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ४ चोरीच्या दुचाकी हस्तगत करत ५ गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.
श्रीप्रस्था येथील गुलमोहर हेरीटेजमध्ये राहणारे विनोद जयदेव दास (२६) यांनी २१ सप्टेंबरला रात्री गणपती विसर्जनाचे वेळी चक्रेश्वर तलाव, गेट नंबर १ येथे पार्क केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासुन दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी सल्लाउद्दीन उर्फ सल्ला हादीश खान (२७) याला ताब्यात घेतले. आरोपीकडे विचारपुस केल्यावर त्याचा नमुद गुन्हात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आलीे. अटक आरोपीकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने नालासोपारा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये मागील काही दिवसामध्ये चार दुचाकी चोरी केल्याचे तपासात उघड झाले. त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या ४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तसेच श्रीप्रस्था येथील एच.पी.पेट्रोल पंपाचे ऑफीसमधून चोरलेली बॅग व रोख रक्कम असा एकूण २ लाख १५ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपी नालासोपारा पोलीस ठाण्यातील प्राण्यांना क्रृरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या गुन्हयात पाहीजे आरोपी आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोतमिरे, सहायक पोलिस निरीक्षक पंडीत मस्के, अमोल तळेकर, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटुलकर, प्रेम घोडेराव यांनी केलेली आहे.