सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात आचोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 05:10 PM2022-12-20T17:10:43+5:302022-12-20T17:12:06+5:30

४ गुन्ह्यांची उकल करून ११ चोरीच्या सायकली हस्तगत

achole crime investigation branch succeeded in nabbing the cycle stealing criminal | सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात आचोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश

सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात आचोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : आचोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी गस्ती दरम्यान एका संशयास्पद तरुणाला त्याच्याकडील सायकलबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर आरोपीकडून ४ गुन्ह्यांची उकल करून ११ चोरीच्या सायकली हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

वसंत नगरीच्या सेक्टर नंबर १ मधील मृदंग अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्याम पाटील (४६) यांचा मुलगा १५ डिसेंबरला दुपारी एव्हरशाईन येथील स्मशानभूमी रोडवर सायकल उभी करून पात्र विधीसाठी गेला. त्याचवेळी चोरट्याने त्याची सायकल चोरी करुन चोरुन नेली होती. सदरबाबत आचोळे पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वसई, विरार, नालासोपारा परिसरात तसेच आचोळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये सायकल चोरीचे गुन्हे घडत असलेबाबत व सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरट्याचा शोध घेणेबाबत आचोळे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी/अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे चोरट्याचा शोध घेत होते.

रविवारी आचोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त करीत असताना सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान वसंत नगरी ते आचोळे गावाकडे जाणाऱ्या रोडवर वसंत नगरी गेटचे दिशेने एक तरुण विवेलो कंपनीची नारंगी काळ्या रंगाची गिअर असलेली सायकल चालवत घेवुन जात असताना मिळुन आला. त्याचा संशय आल्याने त्याला थांबवुन सायकलबाबत विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याला सायकलसह पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलीस ठाणे अभिलेख पडताळला असता त्यामध्ये ती सायकल व चोरीस गेलेली सायकल हि हुबेहुब वर्णनाची मिळुन आली. पोलीसांनी आरोपी राजकुमार मेवाडा (१८) याला अटक करून चौकशी केली. आरोपीकडे कौशल्यपुर्ण विचारपुस करुन सखोल तपास केला असता त्याचेकडुन ९८ हजारांच्या ११ सायकल हस्तगत करुन चार गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. 

आरोपीकडून चार गुन्ह्यांची उकल करून ११ चोरीच्या सायकल हस्तगत

आरोपीकडून चार गुन्ह्यांची उकल करून ११ चोरीच्या सायकल हस्तगत केल्या आहेत. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी आहे. त्याच्याकडून अजून काही गुन्हे व सायकली चोरी केल्या आहेत का त्याची चौकशी करत आहे. - चंद्रकांत सरोदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: achole crime investigation branch succeeded in nabbing the cycle stealing criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.