अभिनय स्पर्धेत पाटील प्रथम

By admin | Published: April 1, 2017 05:13 AM2017-04-01T05:13:44+5:302017-04-01T05:13:44+5:30

वसईत झालेल्या पहिल्या स्व. नाना वळवईकर स्मृती वैयक्तीक अभिनय स्पर्धेत वसईच्या अंजली पाटीलने

Acting champion Patil first | अभिनय स्पर्धेत पाटील प्रथम

अभिनय स्पर्धेत पाटील प्रथम

Next

वसई : वसईत झालेल्या पहिल्या स्व. नाना वळवईकर स्मृती वैयक्तीक अभिनय स्पर्धेत वसईच्या अंजली पाटीलने बाजी मारली. मुंबईच्या रुचिका राऊतने द्वितीय तर नालासोपारा येथील नितेश भोंडवे याने तिसरा क्रमांक पटकावला. सागर भांडारकर आणि कल्याणी बागवाले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अनिल बांदीवडेकर , अभिनेते अनिल गवस, ज्येष्ठ नेते उद्धव घरत यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धाप्रमुख विलास पागार यांनी वसई तालुक्याच नाट्यविषयक घडामोडींचा आढावा घेतला.
वसई तालुक्याला साहित्य व नाट्य कलेचा मोठा वारसा लाभला आहे. इकडे सतत काही तरी नवे घडत असते. मोठे उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक कार्यकर्त्यांची फळी याठिकाणी आहे. नेतेसुद्धा उपक्रमांच्या पाठीशी असतात. नटश्रेष्ठ दत्ताराम यांचा वारसा चालवणारे नव्या पिढीचे कलावंत आहेत, असे डॉ. अनिल बांदीवडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. वसईत नाट्यविषयक संशोधन केंद्र निर्माण व्हावे. वस़ईसह राज्यातील नाट्य-चित्रपट क्षेत्रातील नव्या-जुन्या काळातील घडामोंडीचा, वाटचालींचा अभ्यास व्हावा. संशोधन कार्याला भरपूर वाव असल्याचेही बांदीवडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर, अभिनेते हेमंत राऊत, नाट्यलेखक रमाकांत वाघचौडे, देवव्रत वळवईकर, अशोक वळवईकर, नाना वळवईकर, प्रकाश वनमाळी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)

स्पर्धक होते चाळीस
वसईतील अमर कला मंडळ व वसई तालुका कला क्रीडा महोत्सव समितीने ही स्पर्धा आयोजित केली होती. राज्यभरातून १०४ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील पहिल्या ४० स्पर्धकांना प्रवेश देण्यात आला होता. ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत भालेकर, रेखा बडे, डॉ. तुळशी बेहरे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

Web Title: Acting champion Patil first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.