वसईमध्ये १,०७,६५३ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:58 PM2020-11-19T23:58:12+5:302020-11-19T23:58:28+5:30

तालुक्यातील बेशिस्त वाहनचालकांना दंड : ४ कोटी ८४ लाख ४७ हजार वसूल

Action on 1,07,653 vehicles in Vasai | वसईमध्ये १,०७,६५३ वाहनांवर कारवाई

वसईमध्ये १,०७,६५३ वाहनांवर कारवाई

Next

मंगेश कराळे
n  लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : वसई तालुक्यात वाहतूक विभागाला तुटपुंज्या कर्मचारीवर्गासह वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. वसई वाहतूक विभागाने पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली वसई, नालासोपारा, विरारच्या मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करून गेल्या ९ महिन्यांत १ लाख ७ हजार ६५३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून ४ कोटी ८४ लाख 
४७ हजार रुपयांचा दंड वसूल 
केला आहे.
रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने व अन्य वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान वाहतूक विभागासमोर उभे ठाकलेले आहे. वाहनचालक सर्व कायदे पायदळी तुडवत मनाला वाटेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करतात. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने विरोध केल्यावर वाहनचालक हुज्जत घालून शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. 
काही वेळा राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे कारवाई करण्यास अडचणी निर्माण होतात. तरीही तुटपुंज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक विभागाने हार न मानता गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कारवाई करण्यासाठी कंबर कसून कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे. 
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वसई वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विलास 
सुपे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई 
केली आहे.

वाहतुकीवर नियंत्रण राखतात ७६ पोलीस
वसई तालुक्याच्या विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या चार शहरांतील रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी फक्त ७६ वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. तुटपुंज्या पोलीस 

कोरोनामुळे रेल्वे वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीत वाढ झाली आहे. आयुक्तालय झाल्याने वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाची संख्या लवकरच वाढणार आहे. लॉकडाऊन काळात १ लाखापेक्षा जास्त केसेस केल्या आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली भंगार वाहने उचलून एका ठिकाणी जमा करण्यात आली आहेत. अनधिकृत रिक्षा, बिनापरवाना, फॅन्सी नंबर, नंबर न टाकलेल्या वाहनांवर नेहमी कारवाई सुरू आहे.
- विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसईबळावर वाहतूककोंडी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ होते. लाखोंच्या घरात असलेली लोकसंख्या आणि त्यांची रस्त्यावर धावणारी वाहने या सर्वांसाठी तुरळक वाहतूक पोलीस असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Action on 1,07,653 vehicles in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस