रुग्णवाहिका नाकारणा-या डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:22 AM2018-01-06T06:22:25+5:302018-01-06T06:22:36+5:30

पालघर मधील दिलखुश दिलीप मंडल (९) या मुलाला श्वानदंश झाल्यानंतर उपचारासाठी मुंबइला नेण्यासाठी १०८ नंबरच्या रु ग्णसेविकेचे डॉ. राजेश राय ह्यांनी नकार दिल्या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.

 Action for suspension of the ambulance-turned doctor | रुग्णवाहिका नाकारणा-या डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

रुग्णवाहिका नाकारणा-या डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

Next

पालघर -  पालघर मधील दिलखुश दिलीप मंडल (९) या मुलाला श्वानदंश झाल्यानंतर उपचारासाठी मुंबइला नेण्यासाठी १०८ नंबरच्या रु ग्णसेविकेचे डॉ. राजेश राय ह्यांनी नकार दिल्या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.
इयत्ता तिसरी इयत्तेत शिकत असलेल्या पालघरच्या दिलखुश ह्याला श्वान दंश झाल्यानंतर अत्यावस्थेत त्याला पालघरच्या ग्रामीण रु ग्णालयात आणले असता त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
दिलखुश च्या नातेवाईकानी १०८ नंबर रु ग्णवाहिकेत कार्यरत असणाºया डॉ. राय ह्यांना फोन करून ग्रामीण
रु ग्णालयात तात्काळ रु ग्णवाहिका आणण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी आम्ही श्वानदंश केलेल्या रु ग्णाला
सुविधा देत नाही असे धक्कादायक उत्तर दिले. अनेक मिन्नतवाºया करूनही राय ह्यांनी रु ग्णवाहिका देण्यास नकार दिल्यानंतर खाजगी रु ग्णवाहिकेची व्यवस्था करे पर्यंत बराच वेळ निघून गेला.
दरम्यान, वेळीच उपचार न मिळाल्याने दिलखुश ह्याचा उपचारा नंतर मृत्यू झाला. ह्या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हाशल्य चिकित्सक कार्यालयाला गराडा घातला होता. सदर प्रकरणी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्याने त्याचे निलंबन करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत मुलाच्या नातेवाईकानी केली होती.
प्राथमिक स्तरावरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वानेरे ह्यांनी घटनेचे गांभीर्य पाहता डॉ.राय रु जू असलेल्या १०८ ह्या रु ग्णवाहिकेचा ठेका घेतलेल्या भारत विकास ग्रुप कंपनी (बिविजि) च्या मुख्य कार्यालयाला तक्र ार करून कारवाई करण्याचे पत्र लिहिले. त्या पत्राच्या अनुषंगाने राय यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Web Title:  Action for suspension of the ambulance-turned doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर