लैंगिक अत्याचार करणारा अटकेत, शाळेतच मुलावर अतिप्रसंग, आणखी चार विद्यार्थ्यांचीही तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:16 AM2017-10-20T04:16:45+5:302017-10-20T04:17:51+5:30

नालासोपारा येथील शाळेच्या प्रसाधनगृहात एका आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच शाळेतील एका १४ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.

 In addition to sexually abusing the child, the school is in high school and four more students also complain | लैंगिक अत्याचार करणारा अटकेत, शाळेतच मुलावर अतिप्रसंग, आणखी चार विद्यार्थ्यांचीही तक्रार

लैंगिक अत्याचार करणारा अटकेत, शाळेतच मुलावर अतिप्रसंग, आणखी चार विद्यार्थ्यांचीही तक्रार

Next

वसई : नालासोपारा येथील शाळेच्या प्रसाधनगृहात एका आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच शाळेतील एका १४ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आता आणखी चार विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलाचे लैंगिक शोषण केले गेले असल्याची तक्रार केली आहे.
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेच्या प्रसाधनगृहात ९ आॅक्टोबरला एका आठ वर्षांच्या मुलावर त्याच शाळेतील एका १४ वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पीडित मुलाला शिवीगाळ करीत, हा प्रकार कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली होती. भेदरलेल्या मुलाने हा प्रकार आपल्या घरी सांगितल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी कलम ३९९सह पोस्कोच्या गुन्ह्याखाली त्या मुलाला बुधवारी पोलिसांनी अटक केली. कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही घटना घडल्यानंतर आता आणखी चार विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे शाळेत घबराट पसरली आहे. पोलिसांनी पीडित मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शाळेतील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अधिक तपास केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांकडूनही चौकशी केली जात आहे.

Web Title:  In addition to sexually abusing the child, the school is in high school and four more students also complain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.