दुरावलेल्या शिवसैनिकांना पक्षाशी जोडा- प्रताप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:31 PM2018-07-21T23:31:58+5:302018-07-21T23:32:31+5:30

प्रताप सरनाईक यांच्याकडून सामाजिक उपक्रमांची जंत्री सादर

Adds the different Shiv Sainiks to the party - | दुरावलेल्या शिवसैनिकांना पक्षाशी जोडा- प्रताप सरनाईक

दुरावलेल्या शिवसैनिकांना पक्षाशी जोडा- प्रताप सरनाईक

googlenewsNext

भार्इंदर : शिवसेनेपासून दुरावलेल्या जुन्या शिवसैनिकांना पक्षाशी जोडा, असे आदेश मीरा-भार्इंदरचे संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरसेवकांसह युवासेनेच्या सर्व पदाधिकारी व सैनिकांना दिले आहेत. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलैला साजरा होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले आहे.
शिवसैनिकांनी वाढदिवसाच्या बॅनरबाजीवर खर्च न करता तो सामाजिक उपक्रमासाठी करण्याचा कानमंत्रही त्यांनी दिला आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाधिक लोकोपयोगी व सामाजिक कार्यक्रम करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
नागरिकांना पक्षाशी जोडताना दुरावलेल्या जुन्या शिवसैनिकांचा विसरही त्यांना न पडता त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करा. मानसन्मान देऊन पक्षाची बांधणी करण्यासाठी नवीन शाखा सुरू करण्याचे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.
सेनेतील अंतर्गत कुरघोडींमुळे दुरावलेल्या व नाराज झालेल्या जुन्या शिवसैनिकांना पुन्हा पक्षात सन्मान मिळण्याची आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी पक्षातील आयारामांचे काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे. काही आयारामांनी सेनेत आपले वजन वाढवून जुन्यांना डावलण्याचा उद्योग सुरू केल्याने गटबाजी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
ही गटबाजी सरनाईकांच्या आदेशामुळे संपुष्टात येईल, अशी अपेक्षा मात्र काही निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. सेनेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

चढाओढ होणार सुरू
केवळ कार्यक्रम न राबवता त्याच्या प्रसिद्धीसाठी समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांचाही आधार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. या आदेशामुळे जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणण्यासाठी शिवसैनिकांची विविध कार्यक्रमांसाठी आता चढाओढ सुरू होणार आहे.

Web Title: Adds the different Shiv Sainiks to the party -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.