आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी एव्हरेस्ट मोहिमेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:18 AM2018-05-08T06:18:13+5:302018-05-08T06:18:13+5:30

आश्रम शाळेतील १० आदिवासी विद्याथ्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी तयार करण्याचा अभिनव उपक्रम आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला आहे .

 Adivasi Ashramshala students on Everest campaign! | आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी एव्हरेस्ट मोहिमेवर!

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी एव्हरेस्ट मोहिमेवर!

Next

पालघर : आश्रम शाळेतील १० आदिवासी विद्याथ्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी तयार करण्याचा अभिनव उपक्रम आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला आहे .
मिशन शौर्यसाठी देवाडा व जिवती या आश्रमशाळेमधून १८ व त्यावरील वयोगटातील इच्छुक विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांच्या सहमतीने निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांचा चमू विमानाने नुकताच काठमांडूला रवाना झाला. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, साहसी खेळाबद्दल आवड निर्माण करणे हा मुख्य उद्देश या मिशनचा असून त्यासाठी ६ टप्यांमध्ये प्रशिाक्षण देण्यात आले.
आदिवासी विकास विभागातर्फे मिशन शौर्य मोहिमेंतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील एव्हरेस्ट शिखर मोहिमेवर निघालेल्या दहा विद्यार्थ्यांना पालकमत्री विष्णूसवरा यांनी शुभेच्छा दिल्या. जगातील सर्वात उंच शिखरावर जाण्याचा हा ऐतिहासिक क्षण तुमच्या आयुष्यात आला आहे, असे गौरवोद्गार काढले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना सोळाव्या वर्षी एव्हरेस्ट फत्ते या प्रेरणादायी पुस्तकांच्या प्रती देण्यात आल्या.
मिशन शौर्य साठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विष्णू सवरा यांनी आपल्या मुंबईतील निवासस्थानी बोलावून सर्वांना आल्पोपहार देवून सर्व विद्यार्थ्यांशी आपलेपणाने संवाद साधला. आस्थवाईपणे चौकशी करु न ही एक अत्यंत अभिमानास्पद गौरवशाली बाब आहे. यातून एक नवा एतिहास घडणार आहे. असे सांगून मोहिमेसाठी मन :पूर्वक शुभेच्छा देवून या चमूला हवाई उड्डाणाने काठमांडूला रवाना केले.
आश्रमशाळा बोर्डा, देवाडा व जिवती येथे जाऊन विद्यार्थ्यांना या मोहिमेबद्दल माहिती देऊन शारीरिक क्षमता असलेल्या इच्छुक ५० विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना प्राथमिक स्वरुपाचे गिर्यारोहण प्रशिक्षण ज्ञान भारती प्रशिक्षण संस्था, वर्धा येथे ५ दिवस देण्यात आले. यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेत वाढ झाली.

प्रशिक्षण व शारिरीक क्षमतेमध्ये वाढ करणे : ज्ञान भारती प्रशिक्षण संस्थेमधून निवड झालेल्या प्रशिक्षणाथींना जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदशानाखाली प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच त्यांना चंद्रपूर शहराजवळील बोर्डा आश्रम शाळेमध्ये नियमित शैक्षणिक शिक्षण देण्यात आले.
रॉक क्लाइंबिंग : भोंणगिरी हैद्राबाद येथे विद्यार्थ्यांना रॉक क्लाइबिंगचे पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.

दार्जीलिंग येथील हिमालयन पर्वतारोहण संस्थेत (ऌ.ट.क) या विद्यार्थ्यांंना १४,००० फूट उंचीवरील गिर्यारोहण व वातावरणाशी समरस होण्याचे प्रशिक्षण २१ दिवस देण्यात आले.
हिमालय पर्वतारोहण संस्थानच्या (ऌ.ट.क) प्रशिक्षणात ‘अ’ श्रेणी प्राप्त १३ विद्यार्थ्यांंनी जिल्हा क्रीडा संकुल येथे योग अभ्यासासोबत चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात २५ दिवस इतर प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title:  Adivasi Ashramshala students on Everest campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.