आदिवासींच्या होळीला पुरणाचा नव्हे कोंबडीचा नैवेद्य
By admin | Published: March 12, 2017 02:01 AM2017-03-12T02:01:40+5:302017-03-12T02:01:40+5:30
येथील आदिवासी संस्कृती आपल्या चाली रितींमुळे आपले वेगळेपणा नेहमीच अधोरेखीत करते. खरतर हा सण पुरणपोळीचा म्हणून प्रसिद्ध असला तरी तालुक्यातील वारली,
- हुसेन मेमन, जव्हार
येथील आदिवासी संस्कृती आपल्या चाली रितींमुळे आपले वेगळेपणा नेहमीच अधोरेखीत करते. खरतर हा सण पुरणपोळीचा म्हणून प्रसिद्ध असला तरी तालुक्यातील वारली, कातकरी समाजाच्या विशिष्ट समूहात कोंबडीचा नैवेद्य दाखवून होळी मातेला मान दिला जातो. घरातील कच्चा बच्चांना नवे कपडे, मुलगा असेल तर हातातील कडा आणि मुलगी असेल तर हार अशी ही परंपरा आहे. पेटत्या होळीत आपल्या कुटुंबाच्या इडापिडा जावो म्हणत श्रीफळ अर्पण करण्यात येते.
विविध प्रकारच्या जाती समूहांमधील विविध प्रकारचे सण साजरे करण्यात येतात. यामध्ये मी पाहीलेली जव्हारची होळी सण एक आठवण. आम्हाला शेतीतून चांगले धनधान्य येऊन आमच्यातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश होऊ दे या भक्ती भावाने होळी केली जाते. या भागात होळी हा सण लहान होळीपासून ते रंगपंचमी पर्यंत साजरा केला जातो. यामध्ये दारुला अधिक मागणी असते. कुणी कुणावर चिखल फेकले किंवा गढुळ पाणी जर टाकले तर राग मानला जात नाही, मी सहजच एक प्रश्न त्यापैकी एका व्यक्तीला केला तुम्हाला याचा राग वगैरे येत नाही का? यावर त्या व्यक्तीने सांगितले की, हँसी मजाकचा सण आहे, बुरा न मानो होली है, म्हटले की सारे काही चालते.
येथील भागात प्रामुख्याने कोकणा, वारली, ठाकुर व इतर आदिवासी बांधव आहेत. गाव पाडयावरील सर्वच रहीवासी या सणासाठी काहीतरी खास करायच्या तयारीत असतात. एकेकाळी लंगोटीवर राहणारे येथील बांधव आता बरेच प्रगत झाले असले तरी त्यांनी आपल्या सण साजरे करण्याच्या परंपरा बदललेल्या नाहीत. जव्हारपासून अवध्या तीन किलोमीटरच्या अंतरावर कापरीचापाडा हे गाव आहे. या ठिकाणी ठाकूर समाजाचे वास्तव्य आहे. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर ेहे बांधव आडवा बांबू धरून उभे राहतात व पोस्त मागतात. मनासारखे पोस्त मिळाले की ते सुंदर नृत्य करून दाखवितात. पोस्त नाही मिळाले तर ते तुम्हाला रंगाने अथवा पाण्याने भिजवून टाकतात. आता पोस्त म्हणजे काय तर बक्षिस म्हणून पैसे देणे. समोरचा जितका तालेवर असेल त्यानुसार त्याने पैसे द्यावे, अशी त्यांची अपेक्षा असते.
१५ ते २० स्त्री- पुरूषांचे असे गट अशा रस्त्यांवर ठिकठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचे तरपा नृत्याचे सादरीकरण लयबदध नाच, वादक सगळंच विलक्षण असत.