महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा, प्रांताधिका-यांनी घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:29 AM2018-03-21T00:29:31+5:302018-03-21T00:29:31+5:30

डहाणू तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा ३० मार्चपासून सुरू होत आहे. या निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदीर ट्रस्ट कार्यलयात सोमवारी सभा आयोजित केली होती.

The administration reviewed the Mahalaxmi Yatra, the meeting organized by the President | महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा, प्रांताधिका-यांनी घेतली बैठक

महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा, प्रांताधिका-यांनी घेतली बैठक

Next

- शशिकांत ठाकूर

कासा : डहाणू तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा ३० मार्चपासून सुरू होत आहे. या निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदीर ट्रस्ट कार्यलयात सोमवारी सभा आयोजित केली होती.
सलग १५ दिवस चालणारी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असून पालघर, ठाणे, मुंबई बरोबरच गुजरात राज्यातील हजारो भाविक या निमित्ताने येथे येत असतात. सतत १५ दिवस चालणाऱ्या ह्या यात्रेत लाखो भाविक येतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा, कायदा व सुव्यवस्था चोख राहावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने डहाणू उपविभागीय अधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यात्रा परिसरातील सर्व विहिरींची स्वच्छता केली असून आरोग्य, शौचालय, पिण्याचे पाणी आदींच्या सुविधा भाविकांना दिल्या जाणार आहेत. ग्रामपंचायती कडून मंदिर व यात्रा प्रांगणात साफसफाई व पाणी सुविधेसाठी कामगारांची नेमणूक केली जाणार आहे. दूरवरील भाविकांसाठी डहाणू आगरातून विशेष बस सुविधा केली जाणार आहेत.
यात्रे दरम्यान चोख पोलीसबंदोबस्त ठेवला जाणार असून यात्रे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष निगराणी ठेवली जाणार आहेत. यावेळी प्रांताधिकारी आंचल गोयल व डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी तयारी संदर्भात उपस्थित अधिकारी व दुकानदारांना सूचना दिल्या आहेत.
या यात्रा तयारीची आढावा बैठक आठवडा भरात घेतली जाईल असे सारंग यांनी सांगितले यावेळी डहाणू पंचायत समिती सभापती राम ठाकरे, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष संतोष देशमुख, जव्हार पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश घाडगे, कासा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, डहाणू सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सरपंच सुंदर झरिवा, ट्रस्टचे कोषाध्यक्ष वसंत सातवी, मधु सातवी, रमेश मलावकर, अनंता खुलात, व आरोग्य, विद्युत, बांधकाम, पशुवैद्यकीय, महसूल एस.टी. महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

४० सीसीटीव्ही अन् ६० सुरक्षारक्षक
ट्रस्ट कडूनभाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी तीन रेलिंग शेड उभारले आहेत. दर्शन सुरळीत होण्यासाठी ६० सुरक्षा रक्षक, २० स्वयंसेवक तर साफसफाई साठी १५ सफाई कामगार यांची नेमणूक केली असून भाविकांच्या सुरिक्षतेतसाठी मंदिर परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून पाण्याची सोय, तसेच मुख दर्शनाची सुविधा केली जाणार असल्याचे यावेळी ट्रस्टचे कार्यवाह शशिकांत ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: The administration reviewed the Mahalaxmi Yatra, the meeting organized by the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.