आंदोलनाला प्रशासनाचा पाठिंबा?

By admin | Published: April 30, 2017 03:52 AM2017-04-30T03:52:01+5:302017-04-30T03:52:01+5:30

श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना घेराव घातल्याच्या निषेधार्थ गेली तीन दिवस काम बंद आंदोलन

Administration's support for the movement? | आंदोलनाला प्रशासनाचा पाठिंबा?

आंदोलनाला प्रशासनाचा पाठिंबा?

Next

विरार : श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना घेराव घातल्याच्या निषेधार्थ गेली तीन दिवस काम बंद आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन छेडताना कर्मचारीनी हजेरीपटावर सह्या करून कामबंद आंदोलन केल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांच्या या भरपगारी आंदोलनाला प्रशासनाने मान्यता दिली आहे का असा प्रश्न विवेक पंडित यांनी आता उपस्थित केल्याने कर्मचारी अडचणीत येणार आहेत.
दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्या रजेवर गेल्याने श्रमजीवीं संघटनेचे आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे. कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाची छायाचित्र पालघर जिल्हा परिषदेच्या अधिकृत फेसबुक पेजवर झळकल्याने या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ‘अधिकृत’ दर्जा मिळाला आहे. त्याचप्रमाणे या आंदोलनाला मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले असून भर पगारी कामबंद आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी २४ एप्रिल रोजी श्रमजीवीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तीन तास घेराव घातला. मात्र शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासोबत एका महिला अधिकाऱ्याला धक्काबुकी करणे, शिवीगाळ करणे, अंगावर धावून येणे आदी प्रकार तक्र ारीमध्ये नोंदविण्यात आले. जिल्हा परिषद व विविध पंचायत समिती कार्यालयात काम बंद आंदोलन २५ एप्रिलपासून सुरू करण्यात आली.
आंदोलन छेडून काम बंद ठेवण्यापूर्वी या अधिकारी कर्मचाऱ्यांनी संबंधितांची परवानगी घेतली होती का? तसेच मोर्चामध्ये सहभागी होताना पूर्वपरवानगी घेतली होती का? हे सवाल देखील उपस्थित होत असून या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर असल्यास या काम बंद आंदोलनाला प्रशासनाची साथ असल्याचे स्पष्ट होईल. विशेष बाब म्हणजे अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी एकीकडे आपले कामकाज बंद ठेवले व दुसरीकडे हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी केली आहे.
या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे काम बंद दिवसांचे वेतन निघणार का? हा देखील उत्सुकतेचा विषय ठरू लागला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या फेसबुक पेजवर ‘काम बंद’ आंदोलनाची विविध छायाचित्र झळकली आहेत. जिल्हा परिषदेची विविध कामे, योजनांची माहिती देण्यासाठी उघडलेल्या या पेजवर आंदोलनाची छायाचित्रे आली कशी? त्यासाठी परवानगी घेतली होती का? दिली असल्यास ती कुणी दिली? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. (वार्ताहर)

सीईओंचा आंदोलनाला पाठिंबा?
आंदोलन छेडण्याचा निर्णय हा कर्मचारी अधिकाऱ्यांचा आहे. त्यांना रुजू होण्याची मी विनंती केली आहे. जिपच्या संकेत स्थळावर कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती पोस्ट केली जाते. त्यामुळे त्यांच्या भावना, प्रतिक्रि या फेसबुकवर टाकल्याने त्या सर्व सामान्यां पर्यंत पोहोचवाच्या हेच उद्देश आहे. अशी प्रतिक्रि या देऊन निधी चौधरी यांनी या काम बंद आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.

Web Title: Administration's support for the movement?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.