आॅनलाइन अर्जासाठी तब्बल ३ ते ४ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:17 AM2017-07-29T01:17:26+5:302017-07-29T01:17:26+5:30

मीरा- भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी तब्बल ३ ते ४ तास लागत आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज

aennalaaina-arajaasaathai-tababala-3-tae-4-taasa | आॅनलाइन अर्जासाठी तब्बल ३ ते ४ तास

आॅनलाइन अर्जासाठी तब्बल ३ ते ४ तास

Next

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी तब्बल ३ ते ४ तास लागत आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज
दाखल झालेला नाही. पालिका सचिवांनीही बुधवारी एकही अर्ज आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर शपथपत्र नसल्याने तसेच अन्य तांत्रिक अडचणींमुळे महापौरांनी भरलेला अर्ज देखील स्वीकारला गेला नसल्याचे स्पष्ट झाले. सर्व्हर डाऊन होत असल्यासह काही माहिती भरणे किचकट असल्याचा सूर इच्छुकांनी लावला आहे. यामुळे अर्ज भरण्यास विलंब होत असून उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
आॅनलाइन अर्ज भरल्यावर त्याची प्रतही त्या प्रभागातील निवडणूक अधिकाºयाकडे सादर करायची आहे. परंतु आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना सर्व्हर डाऊन होत असल्याने चांगलाच मनस्ताप होत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे उमेदवाराला काही तास ताटकळत बसण्या शिवाय पर्याय नाही. त्यातच अर्जात एकही रकाना रिक्त ठेवायचा नाही. मागील तीन वर्षाचे आयकर रिटर्न भरण्यासह सेल्स टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, संपत्ती कर लागू असल्याची माहितीही द्यायची आहे. आयकर हा २०१६-१७ चा नव्हे तर त्या आधीच्या तीन वर्षाचा भरल्याची माहितीही द्यायची आहे. याशिवाय सोने, चांदी, हिरे याची स्वतंत्र माहिती भरायची आहे. पती वा पत्नीच्या मालमत्तेसह अवलंबिताचीही सविस्तर माहिती द्यायची आहे.
आॅनलाइन अर्जात सूचक, अनुमोदक यांची स्वाक्षरी तसेच मुद्रांक पेपरची आवश्यकता नाही. निवडणूक अधिकाºयाकडे अर्ज सादर करताना सूचक, अनुमोदक याची स्वाक्षरी लागणार आहे. तसेच शपथपत्र मुद्रांक पेपरवर देण्याची गरज नसून केवळ नोटरी करायची आहे.
विशेष म्हणजे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता विचारतानाच त्यात ग्रेडचाही रकाना आहे. वास्तविक ग्रेड आदी दहावी व त्यानंतरच्या काही परीक्षांना असते. मीरा भार्इंदर संघर्ष मोर्चाच्या प्रभाग १ मधील उमेदवार सरिता शिंदे यांना एसएनडीटी महाविद्यालयात असताना १३ वीला एटीकेटी लागली होती. पण एटीकेटीचा पर्यायच नसल्याने तसेच ग्रेडची माहिती द्यायची असल्याने शेवटी त्यांनी बारावी इतकीच शैक्षणिक पात्रता असल्याचा उल्लेख केला आहे.
भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी महापौर गीता जैन यांनी प्रभाग सहामधून अर्ज भरायला घेतला असता त्यांना जवळपास तीन तास लागले. सर्व्हरमुळे शिवाय जैन यांच्या मालमत्तेचीही माहितीही मोठी असल्याने वेळ लागला. त्यानंतर महापौरांनी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर केला. परंतु आॅनलाइन अर्ज स्वीकारला गेला नसल्याने तसेच शपथपत्र आदी कारणांमुळे महापौरांनी भरलेला अर्ज बुधवारी अधिकाºयाने घेतला खरा पण तो स्वीकारला गेला नाही असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: aennalaaina-arajaasaathai-tababala-3-tae-4-taasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.