दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून सूर्याचा जुन्या योजनेचा वसई विरारचा पाणीपुरवठा ९ तासांनी पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:20 AM2021-11-27T00:20:13+5:302021-11-27T00:20:34+5:30
Vasai Virar News: "मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई फाट्यानजीक सूर्याच्या जुन्या जलवाहिनीला बुधवारी सायंकाळी मोठी गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले होते "
मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई फाट्यानजीक बुधवार दि.२४ नोव्हेंबरला सायंकाळी सुर्याच्या जुन्या जलवाहिनीला मोठया प्रमाणावर गळती लागल्याने तिच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने शुक्रवारी सकाळी ९ वाजता पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले होते आणि ते काम आता जवळपास ९ तासांच्या अथक प्रयत्नाने शुक्रवार दि २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास पूर्ण करण्यात आले आहे.
मात्र दुरुस्तीच्या कामाठिकाणी कॉक्रेटीकरण केल्याने सदरचे दोन्ही पंप शुक्रवारी रात्री १२ वाजता सुरु करणार त्यातच येथील पंप सुरू होऊन काशिदकोपर एमबीआर येथून पाणी पोचण्यास किमान ७ ते ८ तासांचा अवधी लागणार असल्यानं आता सूर्याचा जुन्या व नवीन अशा दोन्ही योजनेचा पाणीपुरवठा शनिवार दि २७ रोजी पासूनच पूर्ववत होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकाने लोकमत ला दिली.