आठ महिन्यानंतरही रोहोयोची मजुरी नाही; नेटवर पैसे जमा खात्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:45 AM2017-12-14T02:45:30+5:302017-12-14T02:45:45+5:30

मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम या तत्वावर कार्यरत असलेल्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेतील मजुरांना आठ महिन्याचा कालावधी उलटूनही मजुरी मिळाली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

After eight months, there is no ROHYO wage; No money deposited on the net | आठ महिन्यानंतरही रोहोयोची मजुरी नाही; नेटवर पैसे जमा खात्यात नाही

आठ महिन्यानंतरही रोहोयोची मजुरी नाही; नेटवर पैसे जमा खात्यात नाही

Next

- रविंद्र साळवे

मोखाडा : मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम या तत्वावर कार्यरत असलेल्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेतील मजुरांना आठ महिन्याचा कालावधी उलटूनही मजुरी मिळाली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील बेरीस्ते ओसरविरा या ग्रुप ग्रामपंचायत मधील घोडीचा पाडा पासोडीपाडा मुकुनपाडा आंबेचापाडा ओसरविरा गारमाळ बाला पाडा अशा नऊ पाड्या मधील १५० ते २०० मजुरांनी एप्रिल महिन्यात रस्त्याचे काम केले आहे परंतु त्यांना त्याची मजुरी अजूनही मिळालेली नाही .
यामुळे त्यांना पदरमोड करून वारंवार तालुक्याला हेलपाटे मारावे लागत आहे. त्यासाठी त्यांचा मजुरीपेक्षा अधिक खर्च झाला आहे. सरकारी बाबूंच्या अनावस्थेमुळे त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे
आम्हाला सात दिवसाच्या आत आमच्या कामाची मजुरी मिळाली नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर मुलाबाळांसह उपोषण करू, असा इशारा येथील येथील ग्रामस्थानी दिला आहे परंतु तक्रार अर्ज देऊन २० दिवसाचा कालावधी उलटूनही प्रशासन याची दखल घेतली नसल्याने येथील गांवकरी उपोषणाच्या तयारीला लागले आहेत. आता सगळ्यांचे लक्ष प्रशासनाकडे लागले आहे.

ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नाराज
येथील ग्रामस्थांच्या अनेक तक्र ारी असतांना त्यावर लोकप्रतिनिधी तोडगा काढत नसल्याने आम्हाला पदरमोड करून तालुक्याला जावे लागत आहे यामुळे आम्ही येथील लोकप्रतिनिधींना कशासाठी निवडून दिले आहे असा सवाल उपस्थित करून ग्रामस्थांनी नाराजी दर्शवली आहे

आम्ही वारंवार रोजगार सेवकाकडे आमच्या कामाच्या मजुरीबाबत विचारणा करून देखील उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहे यामुळे आम्ही उपोषण करणार आहोत.
-गोपाळ मौळे, घोडीचा पाडा

आॅनलाइनला मजुरांच्या खात्यावर पैसे जमा आहेत परंतु खात्यावर मात्र ते दिसत नाहीत .
- बाळासाहेब म्हातारदेव दातीर, ग्रामसेवक, बेरिस्ते ग्रामपंचायत

Web Title: After eight months, there is no ROHYO wage; No money deposited on the net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.