पेंटिंग्जनंतर वारली चित्रशैलीचे ‘टॅट्यू फिव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:41 AM2019-01-12T03:41:47+5:302019-01-12T03:42:22+5:30

पर्यटक व तरुणाईतून पसंती : जव्हार-मोखाड्याच्या ७३ हरहुन्नरी कलाकारांना मिळाला रोजगार

After the painting, 'Tattoo Fever' of Warli Chitralein | पेंटिंग्जनंतर वारली चित्रशैलीचे ‘टॅट्यू फिव्हर’

पेंटिंग्जनंतर वारली चित्रशैलीचे ‘टॅट्यू फिव्हर’

Next

हुसेन मेमन

जव्हार : रोजगार, कुपोषण आणि दुष्काळ अशी ओळख असणाऱ्या जव्हार तालुक्यात आपल्या पारंपारिक कलागुणांना वाव देत टॅट्यूरेखांकनाचे नवे दालन तरुणांना रोजगार उपलब्ध देणारे ठरले आहे. वेस्ट्न टच असणारा हा व्यवसाय हुरहुन्नरी आदिवासी तरुणांनी आपल्या वारली आर्टमुळे आवाक्यात आणला आहे.

वेगवेगळ्या छटा व अर्थ सांगणारी वारली पेंटिग तशी जग प्रसिद्ध असली तरी टॅट्यूम्हणून अजून तिचा विचार झाला नव्हता. येथे भेट देणाºया अनेक पर्यटकांनी आपल्या हातावर, मानेवर, पाठीवर व चेहºयावर हे टॅट्यू कोरल्याने सध्या त्याचे फिव्हर तरुणाईत सुद्धा पहावयास मिळत आहे. जव्हार मोखाडा या आदिवासी तालुक्यात जवळपास ७३ हुन अधिक आदिवासी वारली पेंटिंग कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारच्या वारली पेंटिंग व टॅट्यू रेखांकनामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. जव्हारमधील काही आदिवासी तरु णांनी गोव्यात जावून वारली पेंटिंगमध्ये टॅट्यू कसे काढावे हे शिक्षण घेतले. याच तरु णांनी १५ ते २० तरुणांना त्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे टॅट्यू वारली पेंटिंग निर्मितीत आदिवासी तरुणांना मोठ्या रोजगाराची निर्मिती झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी अनेक शिक्षण संस्था असून लांबलाबचे विद्यार्थी येथे अध्ययनासाठी येथे येत असल्याने त्यांनीही या कलेत रस दाखवायला सुरुवात केली आहे.

आदिवासी वारली हस्तकला, पहाडी भवन वारली पेंटिंग हस्तकला, वारली चित्रकार, अशी जव्हार शहराच्या ठिकाणी स्टुडिओ व खेडोपाड्यात त्यांनी स्वता:च्या घरात वारली पेंटिंग व्यावसाय सुरु केले आहेत. यामध्ये बॉलपीस पेंटिंग, कॅनवास, लाकडी फ्रेम, पेन स्टॅन्ड, टी पोलटर्स, कि चैन, वॉल हँगिंग, ट्रे तसेच कपड्यावर, बेडशीट, ओढणी, पंजाबी ड्रेस, टी शर्ट, साडी कॉर्नर तसेच आॅर्डरप्रामाणे वारली पेंटिंग केली जात आहे. टी शर्टवर वारली पेंटिंगवर करून घेण्याचे सध्या स्थानिक तरुणांमध्ये क्रेझ आहे.
जव्हारला थंड हवेमुळे मिनी महाबळेश्वर असे संबोधन असले तरी पर्यटन व्यवस्था व त्या दृष्टीने नियोजन नसल्याने येथे पर्यटन व्यवसाय हवा तसा फोफावला नाही. काही मोजके धाबे, हॉटेल वगळता तरुणांवर बेकारीची कुºहाड असते. मात्र वारली चित्रशैलीचे टॅट्यू पसंतीस उतरत असल्याने त्यांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध होत आहे. त्यातच नाशिक, मुंबई ठाण्यातील अधिकारी वर्गाने या पेंटींग्स सोबत नेल्याने या कलेची ओळख वाढत आहे.
 

Web Title: After the painting, 'Tattoo Fever' of Warli Chitralein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.