मनसेच्या ठिय्यानंतर शाळा आली वठणीवर, अॅटोमिक सेंट्रल स्कूलचा प्रवेश वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:43 AM2019-06-23T00:43:12+5:302019-06-23T00:43:36+5:30
तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहतीमध्ये असलेल्या अॅटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल या शाळेमध्ये मोफत शिक्षण हक्क (आरटीई ) च्या प्रक्रि येमध्ये प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात...
बोईसर - तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहतीमध्ये असलेल्या अॅटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल या शाळेमध्ये मोफत शिक्षण हक्क (आरटीई ) च्या प्रक्रि येमध्ये प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शाळा व्यवस्थापनाने शुक्र वारी (दि. २१) मनसेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर देण्यात आले.
काही विद्यार्थी आरटीई -२००९ या कायद्याच्या अंतर्गत पात्र असूनही त्यांना वगळण्यात येऊन पहिली लिस्ट पालकांना सूचना न देता रद्द करण्यात आली तर आरटीई- कायद्याच्या अनुषंगाप्रमाणे पात्र मुलांची निवड झाली नसल्याची तक्र ार पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती.
यादीबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी यांनी प्रवेश प्रक्रि या नव्याने करावयास तोंडी सांगण्यात आल्याने त्यानुसार सर्व प्रक्रि या नव्याने करण्यात आली. तर चौकशी अहवालात अर्ज क्र मांक ७५, ४८, १२ यांच्या अर्जाचे अवलोकन करण्यात आले. सदर अर्ज शाळेने नाकारण्यात आलेले आहेत. सदर अर्ज शाळेने नाकारणे अपेक्षित नव्हते. सदर अर्जातील अर्जदाराचा पत्ता / राहण्याचे ठिकाण पाहता ते १ किमीच्या परिसरातील आहेत व स्थानिक आहेत. संबंधिताची नाव नावे विना लॉटरी पद्धतीने समाविष्ट होणे अपेक्षित होते असे नमूद केले होते
ज्या पाच विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले त्यांना प्रवेश द्यावाच तर फॉर्म नंबर ४८ बरोबर जातीच्या दाखल्यासंदर्भात पोच पावती जोडली होती तरीही त्याच्यावर अन्याय करण्यात आला असून अन्याय झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या शिवाय शाळेतून जाणार नाही ही ठाम भूमिका एनपीसीआयएलचे व शाळा व्यवस्थापनाचे अधिकारी कुलकर्णी अरोरा यांचे समोर मनसे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी घेतली. त्या नंतर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले या वेळी पदाधिकारी अनंत दळवी , भावेश चुरी , धीरज गावड आदी उपस्थित होते.