महिला पोलिसाशी गैरवर्तन आले अंगाशी; दंडाची रक्कम भिरकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:38 PM2019-01-04T23:38:01+5:302019-01-04T23:38:09+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीनजणांवर कारवाई करून दंड आकारल्यावर, दंडाची रक्कम महिला पोलिस कर्मचाऱ्यावर भिरकावून असभ्य शेरेबाजी करणा-यांना अटक करण्यात आली आहे.
वसई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीनजणांवर कारवाई करून दंड आकारल्यावर, दंडाची रक्कम महिला पोलिस कर्मचाऱ्यावर भिरकावून असभ्य शेरेबाजी करणा-यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या तरु णांवर गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना ३१ डिसेबरच्या रात्री वाहतूक पोलिसांनी शहरात बंदोबस्त ठेवला होता. त्यावेळी दुचाकीवरून जाणाºया पंकज राजभर, सुमित वाघरी आणि विवेक सिंग या त्रिकुटावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडे वाहनांची कागदपत्रे नव्हती. तसेच त्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात दंड जमा करण्यास सांगण्यात आले होते. बुधवारी दुपारी हे तिघे वाहतूक शाखेच्या अंबाडी रोड कार्यालयात आले. त्यांना ४ हजार ७०० रु पयांचा दंड आकारण्यात आला होता. महिला कर्मचारी स्वाती गोपाली यांनी तडजोड करत २१०० रु पये दंड भरण्यास सांगितले. मात्र, पंकज राजभर याने दोन हजारांची नोट काढून गोपाले यांच्या हातात न देता टेबलावर फेकली. ती नोट खाली पडली. त्यानंतर विवेक सिंग याने खिशातून 100 रु पयांची नोट काढून गोपाले यांच्या अंगावर भिरकावली.
एक दिवसाची कोठडी
या प्रकारामुळे गोपाळे यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. त्या तक्र ारीनुसार तिघांवर सरकारी कर्मचाºयांच्या कामांत अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.