वसई-विरार महापालिकेतील वर्ग-३ ची रिक्त पदे भरण्यासाठी एजन्सी नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:48 AM2020-08-26T00:48:18+5:302020-08-26T00:48:28+5:30

आयुक्त गंगाथरन डी. यांचे संकेत : भरतीची ई-निविदा प्रक्रिया सुरू

An agency will be appointed to fill the vacant posts of class-3 in Vasai-Virar Municipal Corporation | वसई-विरार महापालिकेतील वर्ग-३ ची रिक्त पदे भरण्यासाठी एजन्सी नेमणार

वसई-विरार महापालिकेतील वर्ग-३ ची रिक्त पदे भरण्यासाठी एजन्सी नेमणार

googlenewsNext

वसई : वसई-विरार शहर महापालिकेमधील अपुरा कर्मचारी वर्ग तसेच वषार्नुवर्षे संवर्गातील भरणा न केलेली रिक्त पदे व पालिका संदर्भातील मंजूर आकृतिबंधानुसार लवकरच वर्ग-३ ची रिक्त पदे भरण्यासाठी महापालिका प्रशासन एजन्सी नेमणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी स्पष्ट केले आहे.

वसई-विरार शहर महानगर-पालिकेची स्थापना होऊन ११ वर्षे होत आली, मात्र पालिका स्थापनेनंतर ४ नगरपरिषदा व संबंधित ग्रामपंचायतीमधील कर्मचारी महानगरपालिकेत वर्ग करण्यात आले, परंतु यातील कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्यामुळे आजवर व सध्या ठेका पद्धतीने कर्मचारी नेमून त्याद्वारे कामकाज केले जात आहे.

दरम्यान, महापालिकेच्या मंजूर आकृतिबंधानुसार वर्ग-३ ची विविध संवर्गातील पदे महानगरपालिकेत आजही रिक्त आहेत आणि हीच रिक्त पदे लवकरात लवकर भरणे अपेक्षित असल्याने याकरिता महापालिकेकडून वेळोवेळी प्रयत्न सुरू होते. त्याच अनुषंगाने महापालिकेमार्फत वर्ग-३ च्या पदांची संगणक प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया करण्याकामी अनुभवी सक्षम यंत्रणा/अभिकर्त्याची (एजन्सीची) नेमणूक करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी सक्षम यंत्रणा/अभिकर्ता (एजन्सी) नेमण्याकामी महानगरपालिकेतर्फे ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याबाबतीत एजन्सी नेमल्यानंतर सदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तर नवीन भरती केल्याने महानगरपालिकेस स्वत:चा जबाबदार कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल व त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होऊन महानगरपालिकेच्या कामाच्या दर्जातदेखील सुधारणा होईल, असे आयुक्त गंगाथरन डी. यांनी निर्देशित केले आहे.

Web Title: An agency will be appointed to fill the vacant posts of class-3 in Vasai-Virar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.