कृषी शास्त्रज्ञ कुशारेंना पुरस्कार
By admin | Published: February 26, 2017 02:26 AM2017-02-26T02:26:07+5:302017-02-26T02:26:07+5:30
ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अँड एज्युकेशन ग्रोथ या संस्थे मार्फत डहाणूतील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत कुशारे यांना भारत शिक्षारत्न या राष्ट्रीय पुरस्काराने
- अनिरुद्ध पाटील, बोर्डी
ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अँड एज्युकेशन ग्रोथ या संस्थे मार्फत डहाणूतील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत कुशारे यांना भारत शिक्षारत्न या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या वापराने शेती उत्पादन वाढविण्याचे शिक्षण प्रात्यिक्षकाद्वारे देण्याचे कार्य कुशारे यांनी केले. त्यामुळे आदिवासीं शेतकऱ्यांनी भात, नागली, वरई, खुरसनी पिकांची लागवड सामूहिक शेती पद्धतीने करून आधुनिकतेचा अवलंब केला. त्यामुळे स्थानिक विविध पिकांच्या जातींचे संवर्धन झाले असून अनेक कुटुंब शेतीकडे वळली. त्यांचा आर्थिक व सामाजिकस्तर उंचावण्यास मदत झाली आहे. या योगदानाबद्दल २० फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या स्पीकर हॉल मध्ये माजी राजदूत डॉ. व्ही. बी. सोनी, हायकमिशनर कारचो सॅम्युल यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.