आई तुझं लेकरू... हंडाभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माऊलीसाठी लेकानं खोदली विहिर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 10:21 AM2023-05-04T10:21:39+5:302023-05-04T10:23:15+5:30

डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतेय, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय, असा दावा करतेय

Ai Tuj Lekeru... The son dug a well for Mother who was begging for a bucket of water in palghar | आई तुझं लेकरू... हंडाभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माऊलीसाठी लेकानं खोदली विहिर

आई तुझं लेकरू... हंडाभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माऊलीसाठी लेकानं खोदली विहिर

googlenewsNext

पालघर - आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी दशरथ मांझीने चक्क डोंगरच फोडला होता. दिवंगत पत्नीच्या आठवणीत मांझीने गावातील महिलांना, ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने चक्क डोंगर फोडून रस्ता बनवला. त्या माझीवर चित्रपटही बनवण्यात आला आहे. त्याचप्रकारची घटना पालघरच्या आदिवासी पाड्यात घडली आहे. आपल्या आईला पाणी आणण्यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहाता, आईचे कष्ट सहन न झाल्याने एका शाळकरी मुलाने चक्क घराजवळच विहिर खोदली आहे. प्रणव रमेश सालकर असं या मुलाचं नाव असून तो इय्तात नववीत शिकत आहे. 

डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतेय, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय, असा दावा करतेय. पण, पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र या ‘विकास’ महाशयांना सापडतच नाहीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना  पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षा आहे. पालघरच्या अनेक पाड्यावरील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी दोन किमीचा डोंगर करावा लागत आहे. 

केळवे गावात धावांगे पाडा हा ६०० ते ७०० लोकवस्तीचा पाडा आहे. खाजण जमिनीचा भाग असल्याने येथील विहीर व बोरिंगला खारट पाणी येते. त्यामुळे या पाड्याला पाण्याची कायमच चणचण भासते. केळवे गावाला महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवले जात असले, तरी नळाला आठवड्यातून रविवार, मंगळवार व गुरुवारी असे तीन दिवसच पाणी येते. येथील दर्शना व रमेश यांचे कुटुंबीय शेतमजुरी करुन जगते. कामावरुन आल्यानंतर दर्शना यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आईला होणारे हे कष्ट पाहून मुलगा प्रणवने घराजवळील अंगणातच चक्क खोल खड्डा खांदला. १४ वर्षीय प्रणवने स्वतःच्या अंगमेहनतीने घराच्या परिसरात खड्डा खोदत खोदत अखेर विहीरच खोदली, असेच म्हणता येईल. विशेष म्हणजे, १५ फूट खोल खड्डा खोदल्यानंतर येथे पाणीही लागलं आहे. त्यामुळे, प्रणवच्या मेहनतीला फळ मिळालं, मायेच्या प्रेमासाठी त्याने घेतलेले कष्ट सार्थकी लागले. 
 

Web Title: Ai Tuj Lekeru... The son dug a well for Mother who was begging for a bucket of water in palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.