वायू वादळाने डहाणूत चिकूची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:27 PM2019-06-20T23:27:17+5:302019-06-20T23:27:20+5:30

५५० मॅट्रिक टन उत्पादनावर परिणाम; बागायतदारांची भरपाईची मागणी

Air Cyclone Thrips | वायू वादळाने डहाणूत चिकूची गळती

वायू वादळाने डहाणूत चिकूची गळती

Next

बोर्डी : वायू चक्रीवादळादरम्यान सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने चिकू फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन बागायतीत फळांचा खच पडला आहे. या फळाचे तालुक्यातील क्षेत्र साडेपाचहजार हेक्टर असून सुमारे साडेपाच मॅट्रिक टन फळांचे नुकसान झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. दरम्यान शासनाने तत्काळ भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अरबी समुद्रात मागील आठवड्यात वायू चक्र ीवादळ निर्माण झाले होते. ते खोल समुद्रातून मुंबई, पालघर आणि गुजरातच्या दिशेने पुढे सरकत गेले. या काळात वादळी वारे वाहून जिल्ह्यात जीवित आणि वित्तहानी झाल्याची नोंद झाली नसली, तरी जोराच्या वाºयामुळे बागायतीतील छोट्या चिकू फळांची मोठ्या प्रमाणात गळती होऊन बागायतदारांना नुकसान सोसावे लागले आहे. डहाणू तालुक्यातील हे प्रमुख फळपीक असून त्याचे नोंदणीकृत क्षेत्र साडेपाचहजार हेक्टर तर नोंदणी न झालेले क्षेत्रही मोठे आहे. एकूण जिल्ह्याचा विचार करता त्यामध्ये मोठी वाढ होईल. दरम्यान वाºयामुळे एका झाडाखाली किमान पाच किलो फळगळती झाली आहे. ही फळे पक्व झाली असती, तर त्यांचे वजन दुपटीने वाढले असते. त्यानुसार एका एकरात ४० झाडे या प्रमाणे ४०० किलो फळांचे नुकसान झाले आहे. तर एका हेक्टरात १०० झाडांप्रमाणे १ टन फळांचे नुकसान झाले आहे. एकूण साडेपाचहजार हेक्टराचा विचार केला असता, ५५ हजार झाडांचा समावेश असून ५५० मॅट्रिक टन उत्पादन वाया गेले आहे. शिवाय सातबाºयावर नोंदणी न झालेल्या झाडांचे प्रमाणही मोठे असल्याने हा आकडा वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झालेल्या बागायतदारांचे प्रमाण मोठे आहे.

तर ही झळ चिकू फळतोडणी करणाºया आदिवासी मजुरांनाही बसणार असून त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. तालुक्यात रोजगाराअभावी स्थलांतराचा प्रश्नही ऐरणीवर आहे. काही कुटुंबात कुपोषित बालकांचे प्रमाणही दिसून येते. त्यामुळे तालुक्याला रोजगार देणाºया या चिकू फळांचे झालेले नुकसान पाहता, तत्काळ शासनाने नुकसान भरपाई घोषित करण्याची मागणी बागायतदारांनी केली आहे.

वायू चक्र ीवादळामुळे चिकू बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फलगळती झाली आहे. त्याचा फटका आगामी उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. याकरिता शासनाने तत्काळ मदत जाहीर करणे आवश्यक आहे.
- देवेंद्र राऊत, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त बागायतदार

Web Title: Air Cyclone Thrips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.