भोंग्याचा वादच नको! मीरारोडमधील अल शम्स मस्जिदने घातला आदर्श पायंडा; न्यायालयाचा नियमच पाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:33 PM2022-04-18T23:33:20+5:302022-04-18T23:33:52+5:30

मीरारोडच्या नया नगर मधील अल शम्स मस्जिदने घातला आदर्श पायंडा ; सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळांना दिली दिशा 

Al Shams Mosque in Mira Road laid the foundation; used sound limit technology in Loudspeaker Ajan | भोंग्याचा वादच नको! मीरारोडमधील अल शम्स मस्जिदने घातला आदर्श पायंडा; न्यायालयाचा नियमच पाळला

भोंग्याचा वादच नको! मीरारोडमधील अल शम्स मस्जिदने घातला आदर्श पायंडा; न्यायालयाचा नियमच पाळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - सध्या मशिदीच्या भोंग्यांवरून राजकारण तापून धार्मिक वातावरण ढवळून निघाले असताना मीरारोडच्या अल शम्स मस्जिद मध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार आवाजाची पातळी मर्यादेत ठेवण्यासाठी अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा बसवण्यात आली आहे . इतकेच नव्हे तर जमातींना एकाच वेळेत किंवा दोन टप्प्यात नमाज पठणची व्यवस्था करून रस्त्यावर नमाज पठण बंद केले आहे . अल शम्स जामा मस्जिदच्या ह्या आदर्श पायंड्याची चर्चा देश पातळीवर होत असून सर्च धर्मियांच्या धार्मिक स्थळांना दिशा देणारे आहे . 

१९७९ सालात मीरारोडच्या नया नगर भागात आकाराला आलेली अल शम्स जामा मस्जिद सध्या आकर्षक रोषणाई , आतून वातानुकूलित आणि सुंदर अश्या अंतर्गत सजावट मुळे जेवढी चर्चेत आली नाही त्यापेक्षा जास्त भोंग्यांना ध्वनिमापक व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नुसार आवाजाची मर्यादा पाळण्याच्या यंत्रणे मुळे चर्चेत आली आहे . 

कोरोनाच्या काळात लॉक डाऊन असल्याने धार्मिक स्थळे देखील बंद होती . त्या काळात ह्या मस्जिदीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले व जवळपास ते पूर्ण सुद्धा झाले . मस्जिदीला तीन रंगात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . हि रोषणाई यंत्रणा अमेरिकेतून आणण्यात आली आहे . अंतर्गत सजावट देखील डोळ्याचे पारणे फेडणारी आहे . गालिचे , अंतर्गत रोषणाई नमाज पढण्यासाठी केलेली व्यवस्था चर्चेचा विषय आहे . 

परंतु मस्जिदी वरील भोंग्याच्या आवाजा वरून जे राजकारण तापवण्यात आले आहे त्या आवाजाच्या मर्यादेवर मस्जिदीच्या ट्रस्टींनी आधीच उपाय शोधला आहे . न्यायालयाच्या आदेशा नुसार सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये व ध्वनी प्रदूषण बाबत दिलेल्या आदेशांचे पालन काटेकोरपणे करण्यासाठी मस्जिदीचे ट्रस्टी मुझफ्फर हुसेन यांनी जर्मन बनावटीची ध्वनी यंत्रणा मस्जिदी मध्ये बसवली आहे . 

ध्वनी प्रदूषण रोखण्यासह न्यायालयाच्या आदेशांचे पालन व्हावे व परिसरातील लोकांना त्रास होऊ नये यासाठी भोंग्या द्वारे दिल्या जाणाऱ्या अजानच्या आवाजाची मर्यादा राखण्यासाठी जर्मनी वरून आणलेली यंत्रणा बसवली आहे . न्यायालय व शासन निर्देशक नुसार कोणत्या वेळेत आवाजाची मर्यादा किती राखावी हे यंत्रणा ठरवणार आहे . त्यासाठी तज्ज्ञ नेमले आहेत . त्यामुळे भोंग्या वरून दिली जाणारी अजानची हाक मंजूर आजावाजाच्या मर्यादेत राहणार आहे . जेणे करून न्यायालय व शासन आदेशांचे पालन होणार आहे असे मुझफ्फर म्हणाले . 

मस्जिदी मध्ये जागा अपुरी पडते म्हणून रस्ता - गटार व पदपथावर नमाज पढण्यासाठी भाविक बसत असतात . जेणे करून रस्ता - पदपथ मोकळे ठेवण्यासाठी सुद्धा मस्जिदीच्या व्यवस्थापनाने पुढाकार घेतला आहे . त्यासाठी २ ते ३ जमातींना एकत्र नमाज पढण्यासाठी बसवून बाहेरच्या रस्ता - पदपथावर नमाज पढणे आदी बंद केले आहे .  आवाजाची मर्यादा राखण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे व पर्यावरण संरक्षण कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपल्या धार्मिक प्रार्थना - कार्य करताना अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतल्यास निवडणुका आल्या की धर्माचे राजकारण करून तेढ निर्माण करणाऱ्यांना फुकटची प्रसिद्धी मिळणे बंद होईल असा टोला मुझफ्फर यांनी लगावला. 

Web Title: Al Shams Mosque in Mira Road laid the foundation; used sound limit technology in Loudspeaker Ajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.