वसई किल्ल्यात मद्यपींना रोखले; दुर्गप्रेमींना आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:38 PM2020-01-02T22:38:41+5:302020-01-02T22:38:56+5:30

आमची वसईसह सामाजिक संघटनांचा जागता पहारा

Alcoholics stopped at Vasai fort; Happy to the lovers | वसई किल्ल्यात मद्यपींना रोखले; दुर्गप्रेमींना आनंद

वसई किल्ल्यात मद्यपींना रोखले; दुर्गप्रेमींना आनंद

Next

वसई/नालासोपारा : ऐतिहासिक वारसा असलेल्या वसई किल्ल्यात नववर्षानिमित्त दारूपार्टी, अश्लील चाळे आदी प्रकार सर्रास घडत असतात. या घटनांना आवर घालण्यासाठी भारतीय आमची वसईसह पुरातत्त्व विभाग, पालघर पोलीस यांच्यासह विविध संघटनांनी जागता पहारा देत मद्यपींना रोखून वसई किल्ल्याचे पावित्र्य जपले. त्यामुळे दुर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

हजारो मराठा सैनिकांच्या रक्ताने रंजित झालेल्या व त्यांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या ऐतिहासिक, जगप्रसिद्ध व केंद्र सरकारद्वारे संरक्षित अशा वसई किल्ल्यात युरोपीय सत्तेविरुद्ध भारताने पहिला विजय मिळवला होता. या किल्ल्यात इंग्रजी नववर्षानिमित्त ३१ डिसेंबर रोजी दरवर्षी शेकडोंच्या संख्येने लोक मद्यप्राशन करण्यास येत असतात. न्यायालय, पंचायत समिती कार्यालय, दंडाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाºया या किल्ल्यात दरवर्षी व वर्षभर हे प्रकार चालत असतात. अनेक दशकांपासून सज्जन नागरिकांमध्ये याविषयी संताप व खेद व्यक्त होत होता.

‘आमची वसई’ या सामाजिक समूहाने गेल्या पाच वर्षांपासून वसईचे वैभव असलेल्या किल्ल्यात मद्य-व्यसन-अनैतिक प्रकारापासून मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. ३१ डिसेंबर रोजी टीम आमची वसईने भारतीय पुरातत्त्व विभाग व पालघर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने वसई किल्ल्यात जागता पहारा दिला. किल्ल्यात सायंकाळी ६ नंतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला. सुमारे १५० चारचाकी व ५० दुचाकी वाहनांना परत पाठवण्यात आले. मागील वर्षी वाहनांची संख्या अनुक्र मे ३५० व ५०० होती.

आमची वसईने पुढाकार घेऊन राबवलेल्या या मोहिमेचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. अशाच मोहिमा प्रत्येक ठिकाणच्या दुर्गप्रेमी संस्थांनी राबवायला हव्या असे जागृक नागरिकांचे म्हणणे आहे. किल्ल्याचे महत्त्व सांगितल्यावर व प्रबोधनानंतर अनेक युवक युवतींनी यापुढे किल्ल्यात अनैतिक प्रकार करणार नाही व करू देणार नाही, असा निर्णय घेतला आहे. मद्यपान व अनैतिक प्रकार कायमस्वरूपी बंद कसे करण्यात येतील, यासंबंधी वसई पोलीस व पुरातत्त्व विभागाने उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. यापुढे किल्ल्यात अवैध मद्य वाहतूक, मद्यपान, अश्लील चाळे व अनैतिक प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

मागील दोन वर्षांपासून राबवली जाते मोहीम
मागील दोन वर्षांपासून ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून ते १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत पहारा दिला जातो. यंदा किल्ल्यावर आलेल्या अनेक कॉलेज तरु ण-तरु णीशी प्री-वेडिंग संस्कृती, किल्ले संवर्धन मोहीम, संवर्धन जागृती इत्यादी विषयावर मोकळेपणाने संवाद करून प्रबोधन करण्यात आल्याचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी सांगितले.

Web Title: Alcoholics stopped at Vasai fort; Happy to the lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.