सर्वच राजकीय पक्षांना पुढील आठवडा ठरणार धावपळीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:54 AM2019-04-20T00:54:09+5:302019-04-20T00:54:30+5:30

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले असून निवणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़

 All political parties will run for the next week | सर्वच राजकीय पक्षांना पुढील आठवडा ठरणार धावपळीचा

सर्वच राजकीय पक्षांना पुढील आठवडा ठरणार धावपळीचा

Next

विक्रमगड: मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले असून निवणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़ मात्र, पालघर लोकसभेसाठी शिवसेना-भाजप आणि बविआ असा चुरसीचा सामना बघावयास मिळणार आहे़ बविआला सहा लाख मतांची बेगमी करावी लागणार आहे.
पोटनिवडकीच्या मतांच्या आकडेवारी वरुन भाजपा-शिवसेना युतीकडे त्यांच्या एकत्रित मतांची बेरीज केली तर ५ लाख १५ हजार ९९२ मते होतात. तर बविआकडे स्वत:ची २ लाख २२ हजार मते व माकपाची ७१ हजार ८८७ मते अशा एकुण २ लाख ९४ हजार ७२५ मतांची बविआकडे जुळवणूक झाली आहे़ त्यात कॉगे्रसची ४७ हजार ७१४ मते जमा बेरीज ३ लाख ४२ हजार ४३९ पर्यतच पोहचते उर्वरीत १ लाख ७३ हजार ५५३ मतांचा फरक तोडण्यासाठी बविआला युतीची मते आपल्याकडे खेण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मत विभागणी होण्याची चिन्हे आहेत़ यामध्ये प्रामुख्याने महायुती, बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये खरी लढत अपेक्षित आहे़ परंतु उमेदवारांनी मतदारांवर कितीही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला तरी मतांची विभागणी व स्थानिक राजकारण यावरच उमेदवारांचा टिकाव लागणार आहे़ अधिकृतरित्या जाहिर झालेले उमेदवारांची आपला प्रचार सुरु केला असून सभा, रॅली, मतदारांच्या घरोघरी जावून प्रचार सुरु झाला आहे. पूर्वी लोक प्रतिनिधी म्हणून मतदारांनी ज्याच्यावर विश्वास टाकलेला आहे़ त्यांच्या स्थानिक विकास कामाच्या जोरावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहाणार आहे़ २९ एप्रिलला निवडणूक होणार असल्याने रविवार पासून फक्त आठ दिवसांत प्रचारासाठी हातामध्ये उरले आहेत. या आठ दिवसांत आठ तालुके पिंजून काढावे लागणार आहे़ त्यामुळे पुढील आठवडा महत्वाचा ठरणार आहे.
>२०१८ च्या पोटनिवडणुकीची स्थिती
२०१८ ची पोटनिवडणुक बहुजन विकास आघाडीने त्यावेळेस फारशी गांभीर्याने न घेतल्याने हक्कांची मते शिवसेना व भाजपामध्ये विभागली गेली होती. तसेच, यामध्ये कॉगे्रस तर खुपच दुर होते व राष्टÑवादीची मते देखील शिवसेना व भाजपात विभागली गेली. तसेच राजेंद्र गावितांच्या उमेदवारीने देखील भाजपाला फायदा झाला़ तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जावुन इतर पक्षांच्या मतदारांना आपल्याकडे वळविल्यामुळे देखील आणि एकंदरीत ही पोटनिवडणुक प्रतिश्ठेची झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष घातल्याने भाजपाला ही बाजी मारता आली होती़माकप, राष्ट्रवादी, कॉग्रेस व बहुजन विकास आघाडी हे एकत्र लढत देत असल्याने पालघर लोकसभा मतदार संघातील डहाणु, तलासरी, जव्हार व विक्रमगड तालुक्यातील काही भागात माकपाचा प्रभाव आहे़ तर काही भाग त्यांचे बालेकिल्ले म्हणुन देखील ओळखले जातात़ आठ महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत बविआ व माकप आणि राष्टÑवीदी-कॉग्रेस हे वेगळे लढल्याने बविआ तिसऱ्या तर माकप चौथ्या आणि कॉगे्रस पाचव्या क्रमांकवर होते़ यावेळी त्यांची निशाणी हायजॅक झाल्याने त्यांच्यापुढे नवे संकट असणार आहे.
>विक्रमगड विधानसभेतील मतदार करणार नोटा बटनाचा वापर
विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील आदिवासी दºया,खाऱ्यांत राहुन अनेक सुविधाविना पाणी, रोजगार, शिक्षण, दळण-वळण, रस्ते आदी समस्या घेवुन आपले जिवन जगत आलेला आहे़ निवडणुकांत आश्वासना व्यतिरिक्त त्यांना काही मिळत नाही. ़त्यामुळे येथील मतदार नोटाचा वापर करण्याची भुमीका घेणार असल्याचे मतदार बोलत आहेत. तर विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली व अन्य काही गावपाडयातील मतदारांकडुन मतदान करण्यासाठी नाराजीर सुर निघत आहेत. तालुक्यातील अनेक लोक रोजगारासाठी आपल्या कुंटुंबासह इतर षहरांच्या ठिकाणी स्थलांतरी झाल्याने त्यांचाही परिणाम मतदानावर होईल.
>पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत
उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवार पक्ष मिळालेली मते
1) राजेंद्र गावित भाजपा २७२७८२
2) श्रीनिवास वनगा शिवसेना २४३२१०
3) बळीराम जाधव बविआ २२२८३८
4) किरण गहला माकप ७१८८७
5) दामोदर शिगडा कॉग्रेस ४७७१४
6) संदिप जाधव अपक्ष ६६७०
7) शंकर बदादे अपक्ष ४८८४
8) नोटा ---- १६६४४

Web Title:  All political parties will run for the next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.