कातकरी समाजाचा सर्वांगीण विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:25 AM2017-08-11T05:25:01+5:302017-08-11T05:25:01+5:30

कातकरी समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अंत्यत मागासलेला असून त्याच्या विकासासाठी शासनाने हाती घेतलेल्या योजनांचा लाभ त्याला देऊन त्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कातकरी उत्थान अभियाना दरम्यान केले.

All-round development of Katkari community | कातकरी समाजाचा सर्वांगीण विकास करणार

कातकरी समाजाचा सर्वांगीण विकास करणार

Next

पालघर : कातकरी समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अंत्यत मागासलेला असून त्याच्या विकासासाठी शासनाने हाती घेतलेल्या योजनांचा लाभ त्याला देऊन त्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कातकरी उत्थान अभियाना दरम्यान केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अनुलोभ संस्थेच्या प्रेरणेने कातकरी उत्थान अभियानास सुरुवात केली असून अनुलोभचे कार्यकर्ते व शासकीय अधिकारी-कर्मचारी एकित्रत येऊन शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचिवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
अनुलोभचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे यांनी आपल्या भाषणादरम्यान पालघर जिल्ह्यातील या समाजासाठी शासनाच्या सर्व लोकउपयोगी योजना गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचिवण्यासाठी दीड हजार कार्यकर्ते प्रशासनास संपूर्ण सहकार्य करतील अशी ग्वाही दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी देशमुख, उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे ,आदिवासी विकास विभाग डहाणू व जव्हार प्रकल्पाधिकारी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी एन.जेजुरकर तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व अनुलोभ संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कातकरी उत्थान अभियान कार्यशाळेत ग्रामविकास विभागाच्या योजना, संजय गांधी निराधार योजना व जातीच्या दाखल्यांबाबत सादरीकरण, कृषि विभागाच्या योजना, पशु संवर्धन विभागाच्या योजना, आदिवासी विभागाच्या योजना (वन हक्कासह) तसेच कातकरी समाजाबाबत माहितीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यामुळे या समाजातील उत्थानास प्रारंभ होईल, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

जनता व प्रशासन यामधील दुवा साधण्याचे काम अनेक वर्षांपासून अनुलोभ संस्था व त्याचे कार्यकर्ते करीत असून त्यांच्या मार्फत येथील पात्र व गरजू लाभारर्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचिवण्यास मदत होणार आहे. कातकरी समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी सर्व्हे करून त्याअंतर्गत माहिती नमुना तयार करण्यात आला असून या प्रश्नावलीद्वारे गांव पातळीवरील कर्मचाºयांच्या सहभागातून या समाजाचे सखोल र्स्व्हेक्षण करण्यात येइल अशी माहितीही त्यांनी दिली. तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक व आरोग्य सेविका या गाव पातळीवरील कर्मचा-यांनी एकत्रितरित्या कातकरी समाजातील प्रत्येक कुटुंबास भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याविषयीची माहिती या नमुन्यात जमा करावी. माहिती जमा करताना कातकरी समाजातील व्यक्तींची सहानभूतीपूर्वक चौकशी करावी व त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होईल या दृष्टीकोनातून जनजागृती निर्माण करण्याच्या प्रयत्न व्हावेत अशा सूचनाही डॉ.पाटील यांनी कर्मचाºयांना दिल्या.

Web Title: All-round development of Katkari community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.