विधानसभेतील समस्त आदिवासी आमदारांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 07:11 PM2020-12-11T19:11:51+5:302020-12-11T19:12:06+5:30
विधानसभा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
- आशिष राणे
वसई- महाराष्ट्र विधानसभेतील समस्त आदिवासी आमदार सदस्यांनी गुरुवारी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज्यातील आदिवासी बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व अडचणीं विषयी भेट घेत सविस्तर चर्चा केल्याची माहिती बोईसर विधानसभेचे बविआ चे आमदार राजेश पाटील यांनी लोकमत ला दिली.
दरम्यान या राज्यपाल भेटी प्रसंगी उपस्थित प्रत्येक आमदारांनी ज्यांच्या ज्यांच्या विभागातील समस्या व अडचणी राज्यपाल महोदय यांच्या समोर मांडून त्यावर विस्तृतपणे चर्चा केली.
विशेष म्हणजे यावेळी बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील यांनी प्रामुख्याने नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यातील अनेक अडीअडचणी मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने वाढवण येथे होत असलेले बंदर आणि तेथील स्थानिक नागरिक यांच्या अडचणी तसेच पालघर जिल्ह्यातून जात असलेले रेल्वे प्रकल्प,रस्ते प्रकल्प यामुळे येथील स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या राज्यपाल महोदय यांच्या समोर मांडल्या. यावेळी त्यांच्या समवेत विक्रमगड चे आमदार सुनील भुसारा,डहाणू चे आमदार विनोद निकोले,तर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा आणि अन्य जिल्ह्यातील विविध आदिवासी मतदारसंघाचे 12 आमदार उपस्थित होते.