रिलायन्सविरोधात मनसे मैदानात, जमीन अधिग्रहणप्रकरणी मनमानीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 02:24 AM2018-12-22T02:24:18+5:302018-12-22T02:25:40+5:30
तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जात असून त्या साठी कंपनी मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत असून त्यासाठी जमीन जाणाऱ्या शेतक-यांना अल्प मोबदला दिला जात असून शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही दाद मिळत नाही.
तलासरी : तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जात असून त्या साठी कंपनी मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत असून त्यासाठी जमीन जाणाऱ्या शेतक-यांना अल्प मोबदला दिला जात असून शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही दाद मिळत नसल्यामुळे तलासरीत महाराष्ट्र नविनर्माण सेना शुक्रवारी रस्त्यावर उतरली. मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरी जवळ महामार्ग अडविला. यावेळी महामार्गावर चार किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना इतर ठिकाणी गुंठ्याला लाखो रु पये मिळत असताना तलासरी भागातून रिलायन्सची गॅस पाईप जात असून त्या साठी संपादित जमिनीला ५९ हजार रु पये असा अल्प मोबदला दिला जात आहे. या बाबत शेतकºयांनी मोबदल्यातील तफावत बाबत विचारणा रिलायन्सच्या अधिकाºयांकडे केली असता वाढीव मोबदला दिला जाणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
शेतकºयांनी अधिकाºयांना मिन्नतवाºया करुनही दाद मिळाली नाही. राजकारण्यांचे दरवाजे झजवले पण रिलायन्सच्या ओझ्याखाली दबलेल्या राजकारण्यांनी शेतकºयांची बाजू घेतली नाही. यावेळी मात्र तलासरीतील आदिवासी शेतकºयाच्या मदतीला महाराष्ट्र नविनर्माण सेना धावली व शेतकºयाचे बाजूने योग्य मोबदला मिळण्यासाठी आंदोलन केले
शासनाला व रिलायन्सला इशारा देण्यासाठी महामार्ग रोकोचे आंदोलन करण्यात आले. परंतु. त्याची दखल न घेतल्यास या पेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून रिलायन्सची कार्यालये बंद पाडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला आहे.
मनसेने महामार्ग रोखून दोन तास वाहतूक थांबविली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर टाकून ते पेटविल्याने वातावरण तंग झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ ते दूर करुन आंदोलकांना काबूत आणले. यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी योग्य तो बंदोबस्त ठेऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली.